औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्यासमोरच रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांचा तो किस्सा सांगितला.
ADVERTISEMENT
विधानसभेत सिल्लोड मतदारसंघातून अब्दुल सत्तार आमदार आहेत. तर लोकसभेत हा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येतो. रावसाहेब दानवे या मतदारसंघाचे खासदार आहे.
सोलापूर जळगाव रेल्वे आणली नाही तर दानवेंना मत देऊ नका असं सत्तारांनी मतदारांना आवाहन केलं होतं. त्यावर दानवेंनी जोपर्यंत सिल्लोड जिल्हा होत नाही तोपर्यंत सत्तारांना मत देऊ नका, असं आवाहन केलं होतं.
मागण्या कुणी काहीही करू शकतं. सिल्लोड जिल्हा होत नाही आणि रेल्वेचं म्हणाल तर ते इतकं सोप नाही, याची आठवण दानवेंनी यावेळी करन दिली. साहजिकच या नंतर तिथे हशां पिकला.
रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंसमोर नेमकं काय म्हणाले, त्यासाठी पाहा हा व्हीडिओ
ADVERTISEMENT