उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपनेते शरद कोळी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केलीय. शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आले असता निलेश राणे आणि नारायण राणे यांनी विरोध केला. शरद कोळी यांनी विचारले आहे की केंद्राची सुरक्षा घेऊन तुम्ही मर्दानकी दाखवता का? नामर्दांनी पोलीस यंत्रणा बाजूला करून या, मग तुम्हाला शिवसैनिक तुडवणार नाहीत. ह्या तीव्र शब्दात शरद कोळी यांनी नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.