राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातील गावांचे दौरे केले. यावेळी क-हावागज येथे महिलांनी त्यांच्या तक्रारी मांडल्या. गावात 34 बचत गट कार्यरत असूनही महिला अस्मिता भवन नसल्याने महिलांना गैरसोय होते आहे. तसेच, रोजगाराच्या तक्रारी करत महिलांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे विनंती केली. गावाच्या जवळ बारामती शहर असतानाही पिण्याच्या पाण्याचा अभाव आणि ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष हीही एक मोठी समस्या मांडण्यात आली. सुनेत्रा पवार यांनी या समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे.