ज्यांना मुलं नाहीत, अशांना युक्रेनमधल्या मुलांच्या परिवाराचं दु:खं कळणार नाही – नाना पोटेल

मुंबई तक

02 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:09 PM)

ज्यांना मुले नाहीत अशांना युक्रेनमधील मुलांच्या कुटुंबियांचं दु:खं कळणार नाही, असे सूचक वक्तव्य नाना पटोलेंनी गोंदियामध्ये पत्रकारांशी बोलताना केलं आहे. युक्रेनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी अडकून आहेत, मी स्वतः त्या विद्यार्थ्यांशी फोनवर बोललो, त्यांचे व्हिडीओ पाहिले, भारताच्या विदेश मंत्रालयाशी मी अनेकदा बोललो असून त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोपही नाना पटोलेंनी केला आहे.

follow google news
mumbaitak
follow whatsapp