शून्य कोरोना मृत्यूचं मुंबई मॉडेल काय आहे?

मुंबई तक

18 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)

शेवटी 19 महिन्यांनी मुंबईकरांसाठी ‘तो’ सुदिन उजाडला. 17 ऑक्टोबर २०२१ ला मुंबईत कोरोनामुळे एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. मुंबईतल्याच नाही तर देशातल्या कोरोनाविरोधी लढ्याला मोठं बळ या बातमीनं मिळालं. मुंबईच नाही तर संपूर्ण देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच मुंबईतून दिलासादायक बातमी आलीय. मुंबईत रविवारी २४ तासांत ३६७ जणांना कोरोनाची बाधा […]

follow google news

शेवटी 19 महिन्यांनी मुंबईकरांसाठी ‘तो’ सुदिन उजाडला. 17 ऑक्टोबर २०२१ ला मुंबईत कोरोनामुळे एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. मुंबईतल्याच नाही तर देशातल्या कोरोनाविरोधी लढ्याला मोठं बळ या बातमीनं मिळालं. मुंबईच नाही तर संपूर्ण देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच मुंबईतून दिलासादायक बातमी आलीय.

हे वाचलं का?

मुंबईत रविवारी २४ तासांत ३६७ जणांना कोरोनाची बाधा झाली. तर ५१८ जण कोरोनातून बरं होऊन घरी परतले. आतापर्यंत १६ हजार १८० मृत्यू बघणाऱ्या मुंबईत रविवारी कोरोनामुळे एकही जीव गेला नाही. हो, एकही मृत्यू झाला नाही.

१७ मार्च २०२० ला मुंबईत एका ६७ वर्षांच्या व्यक्तीचा कोरोनानं मृत्यू झाला होता. हा मुंबईतला पहिला कोविड मृत्यू होता. त्यानंतर मृत्यूचा अक्षरशः सिलसिलाच सुरू झाला. जून २०२० मध्ये तर एकाच दिवसात तब्बल १३६ जणांना जीव गमावावा लागलाय.

    follow whatsapp