Sunil Kedar Big Starement : काँग्रेस नेते आणि आमदार सुनिल केदार यांनी नागपूर जिल्हा पेटवण्याची भाषा केली आहे. सातगावमध्ये सरपंच आणि उपसरपंच वादावरुन केदार यांनी आक्रमक भूमिका घेतली.
ADVERTISEMENT
सरपंच योगेश सातपुते यांच्यावरील अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यानंतर, केदार यांनी असे म्हटले की, 'तुमच्या केसाला धक्का बसला तर पूर्ण नागपूर जिल्हा पेटवून टाकू'. या वाक्याने नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या या नेत्याच्या वक्तव्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सातगावमधील पाहुणे सरपंच आणि उपसरपंच वाद अजूनही शांत झाला नाही, आणि अशा प्रकारच्या वक्तव्याने या वादाला आणखी उकळणी येण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT