विधानसभा अध्यक्षपदाची जागा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त आहे. नियमाप्रमाणे विधानसभा निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होणार आहे. अशात आता या निवडणूक प्रक्रियेला महाविकास आघाडी सरकार घाबरतं आहे का? अशी एक चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. याची काय कारणं आहेत ते आपण या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.
ADVERTISEMENT
नाना पटोलेंनी राजीनामा दिल्याने हे पद खुलं झालं आहे यासाठी पुन्हा चर्चा झाली पाहिजे. शरद पवारांच्या वक्तव्याचा अर्थ हाच होतो की राष्ट्रवादीलाही या पदामध्ये रस आहे.
महाविकास आघाडीकडून उभा करण्यात आलेला उमेदवार हा बिनविरोध आला तर काहीही अडचण येणार नाही मात्र त्याचवेळी भाजपने जर उमेदवार उभा केला आणि गुप्त मतदान पद्धतीत तो निवडून आला तर सरकार डळमळीत होईल अशीही भीती मविआ सरकारला वाटते आहे अशीही चर्चा आहे. पाहा याच संदर्भातलं सविस्तर विश्लेषण
ADVERTISEMENT