शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढून अनेक घोटोळ्यांचा आरोप केला होता. यामधील एक घोटाळा म्हणजे स्ट्रीट फर्निचर घोटाळा (street furniture scam). या स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याच्या माध्यमातून ठाकरे गट अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याची दाट शक्यता होती. मात्र तत्पुर्वीच मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde)यांनी स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याचा मुद्दा निकाली काढला आहे.दरम्यान या स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यावर मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले आहेत? नेमके त्यांनी आदेश काय दिले आहेत? हे जाणून घेऊयात. (aditya thackeray allegation of street furniture scam cm eknath shinde answer committee wil do inquiry)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री काय म्हणाले?
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याचा आरोप केला होता. या आरोपावर बोलताना स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची चौकशी करू असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. तसेच स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची चौकशी समिती करणार आहे. या प्रकरणाचा योग्य तपास होऊन सत्य बाहेर येईल. त्यामुळे कमिटी नेमून दुध का दुध पाणी का पाणी समोर आले पाहिजे, आम्ही कुठलीही गोष्ट लपून छपून करत नाही, असे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे विरोधकांनी स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यावरून सरकारला अधिवेशनात घेरण्यापुर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांनी हा मुद्दा निकाली काढला आहे.
हे ही वाचा : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच CM शिंदेंची बॅटिंग; म्हणाले, ‘विरोधकांना आता…’
तसेच काही लोक एफडी तोडल्याचा आरोप करतात, मी चहलला विचारले एफडी तोडली का? तर ते म्हणाले, 77 कोटी होते ते 88 कोटी झाले, म्हणजे तिकडे 11 हजार कोटी वाढले आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आम्ही काम करतोय म्हणून पोटसूळ, पोटदूखी वाढलीय. पण आम्ही चांगले काम केल्यावर पोटदुखी ज्याला होईल त्यांना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत फ्रि मध्ये आहे, असा टोला देखील त्यांनी ठाकरे गटाला लगावला. तसचे माध्यम शासन आपल्या दारी दाखवतायत, पण तुम्ही रोज सकाळचा भोंगा दाखवला तर लोक कमी बघतील, असा टोला देखील नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांना लगावला.
आदित्य ठाकरेंचा आरोप काय?
ठाकरे गटाचे (UBT) आदित्य ठाकरे यांनी 1 जुलैला मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढला होता. या विराट मोर्चात आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत सुरु असलेल्या अनेक घोटाळ्यांची माहिती दिली होती. यामध्ये त्यांनी स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला होता. मला माहितीय यांच्या सभेला गर्दी होत नाही, मग खुर्च्या,बेंचेस कशाला घेताय? 40 हजार बेंचेस लावणार कुठे? 10 हजार कुंड्या घेतायत,या कुंड्यात काय लावणार हेच माहित नाही. मुंबई महापालिकेच्या पैशातून कोणत्या 13 गोष्टी विकत घेणार आहात, त्याची रक्कम काय? ज्या गोष्टी 100 कोटीहून जास्त नसायला पाहिजे होत्या, त्या गोष्टी 263 कोटीला जातायत. किती मोठा घोटाळा हे मुंबई महापालिकेत करत आहे. या घोटाळ्याचीही मी नोंद घेतली आहे. त्यामुळे तुम्हाला आत टाकणार म्हणजे टाकरणारच,असा इशाराच आदित्य ठाकरे यांनी दिला होता.
ADVERTISEMENT