Aditya Thackeray Worli Assembly Election Results Live Updates: वरळीतून आदित्य ठाकरे आघाडीवर

मुंबई तक

23 Nov 2024 (अपडेटेड: 23 Nov 2024, 08:06 AM)

Aditya Thackeray Worli assembly election 2024 results live updates: आदित्य ठाकरे वरळी विधानसभा निवडणूक निकाल 2024 : वरळीतील मतदारांनी नेमकं काय ठरवलंय? पाहा लाइव्ह अपडेट

Aditya Thackeray with the party it is related with live: वरळी निकाल लाइव्ह

Aditya Thackeray with the party it is related with live: वरळी निकाल लाइव्ह

follow google news

Aditya Thackeray Worli assembly election 2024 results live updates: मुंबई: आदित्य ठाकरे वरळी विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल लाइव्ह अपडेट: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वरळी या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण याच मतदारसंघात शिवसेना (UBT)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. जिथे त्यांच्यासमोर शिवसेना (शिंदे गट) आणि मनसेचं आव्हान आहे. 

वरळीतून पुन्हा निवडून येण्याचं मोठं आव्हान हे आदित्य ठाकरेंसमोर आहे. कारण मागील निवडणुकीच्या तुलनेने यंदाची निवडणूक आदित्य ठाकरेंसाठी खूपच आव्हानत्मक आहे. कारण मागील निवडणूक ही आदित्य ठाकरेंसाठी काहीशी सोपी होती. पण यंदा चित्र फारच वेगळं आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election Results 2024 : Maharashtra Elections Exit Poll : कोणत्या मतदारसंघात कुणाचा विजय? अख्खी यादी आली समोर

या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध शिवसेना (शिंदे गट) पक्षाने मिलिंद देवरा आणि मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यंदा वरळीतील निवडणूक ही अतिशय चुरशीची होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

जाणून घ्या या मतदारसंघात नेमकं काय घडतंय, क्षणाक्षणाचे अपडेट आम्ही आपल्याला देणार आहोत.

हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election Results 2024 : Maharashtra Vidhansabha Election 2024: पाहा 288 मतदारसंघाची संपूर्ण आकडेवारी, तुमच्या मतदारसंघात...

अशाच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण निकाल हे आपल्या mumbaitak.in या वेबसाइटवर पाहता येतील.

 

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 02:08 PM • 23 Nov 2024
    Mumbai Assembly Election Results Live: वरळी विधानसभेत मतदारांचा कौल कुणाला? 'ही' आहे 13 व्या फेरीतील आकडेवारी

    वरळी विधानसभा मतदारसंघात 13 व्या फेरीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आदित्य ठाकरेंना एकूण 50352 मतं मिळाली आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरांना 42912 इतकं मताधिक्य मिळालं आहे. तर मनसेच्या संदीप देशपांडेंना 16898 मतं मिळाली आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे या मतदारसंघात आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. 

  • 08:48 AM • 23 Nov 2024
    Mumbai Assembly Election Results Live: मुंबईत कोणते उमेदवार आघाडीवर अन् कोण पिछाडीवर?

    मुंबईच्या वरळी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत.

    वांद्रे पूर्व मतदारसंघात झिशान सिद्दीकी आघाडीवर आहेत.

    कुलाबा मतदारसंघातून भाजपचे राहुल नार्वेकर आघाडीवर आहेत.

    वांद्रे पश्चिम मतदारसंघातून आशिष शेलार पिछा़डीवर आहेत.

    अमित ठाकरे माहीममधून आघाडीवर आहेत.

    नालासोपारा इथे क्षितिज ठाकूर आघाडीवर आहेत. 

  • 06:46 AM • 23 Nov 2024
    Aditya Thackeray Worli Assembly Election Results lIVE: वरळीत मशाल धगधगणार? आदित्य ठाकरे होणार विजयी?

    मुंबईतील वरळी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संदीप देशपांडेंनी ठाकरेंच्या विरोधात रणशिंग फुंकलं आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. परंतु, या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचं पारडं जड असल्याचं स्थानिक मतदार सांगत आहेत. 

follow whatsapp