ED चौकशीनंतर रोहित पवारांनी ठणकावून सांगितलं, ‘फक्त लढायचं नाही तर आता जिंकण्यासाठी…’

मुंबई तक

• 05:38 PM • 24 Jan 2024

बारामती अॅग्रो प्रकरणी ईडीकडून आमदार रोहित पवारांची 11 तास चौकशी केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करत त्यांचे त्यांनी जंगी स्वागत केले. त्यानंतर कार्यकर्त्यांचे आभार मानत आता फक्त लढायचं नाही तर आता जिंकण्यासाठी लढायचं असल्याची भावना त्यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली.

After the ED inquiry Rohit Pawar said not only to fight but now to win

After the ED inquiry Rohit Pawar said not only to fight but now to win

follow google news

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार यांना आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. बारामती ॲग्रो कारखान्यात गैरव्यवहार झाल्याचा ईडीकडून दावा करण्यात आला होता, मात्र आमदार रोहित पवारांची ईडी कार्यालयात (ED Office) अकरा तासाच्या चौकशीनंतर बाहेर येत आपण ईडीच्या अधिकाऱ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले असून आता फक्त लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं असल्याचा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.

हे वाचलं का?

लढाई सुरुच राहणार

आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी करण्यात आल्यानंतर रोहित पवार म्हणाले की, कार्यकर्त्यांकडे बघून आता वाटतं की काहीही झालं तरी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेसाठी त्यांच्यासमोर वाकायचं नाही म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. यावेळी अजून ही लढाई संपलेली नाही तर सुरुच राहणार असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांना जोरदार टोला लगावला आहे.

सहकार्य करत राहणार

बारामती अॅग्रो प्रकरणी ईडीकडून रोहित पवारांची अकरा तास चौकशी करण्यात आली. ही चौकशी अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे केली असून यापुढंही त्यांना सहकार्य केले जाईल असा शब्द देत 1 तारखेलाही पुन्हा बोलवण्यात आले असून त्यावेळीही असच सहकार्य केले जाईल असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

हे ही वाचा >> अभिनेत्याने विषारी किड्याला लावला हात, एका झटक्यात आला Heart Attack

लढणाऱ्या मागे खंबीर

जेव्हा एखादा कार्यकर्ता अडचणीत येतो त्याच्यावर अन्याय होतो तेव्हा शरद पवार हे त्याच्यामागे खंबीरपणे उभा असतात, आणि त्याच वेळी ते त्याला संधीही देतात असा विश्वासही त्यांनी शरद पवारांबाबत व्यक्त केला. यावेळी त बारा तास बसले याच्यावरून एक गोष्ट समजून घ्या, ते संधी देतातही अडचणीत येतात तेव्हा त्याच्यामागे पवार साहेब भक्कमपण उभा राहतात. पळणाऱ्या मागे साहेब नसतात तर लढणाऱ्या मागे खंभीरपणे उभा राहतात असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला आहे.

स्व-हितासाठी सत्तेत गेला

आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादा काँग्रेसमधून सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटावरही त्यांनी नाव न घेता निशाणा साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीला सोडून सत्तेत गेलेल्यांना तुम्ही स्व-हितासाठी सत्तेत गेला असल्याची टीकाही त्यांनी अजित पवार गटावर केली आहे.

दिल्लीपुढं झुकणार नाही

बारामती अॅग्रोप्रकरणा 11 तासाच्या चौकशीनंतर रोहित पवारांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी आज ज्या प्रमाणे चौकशी केली आहे, त्याच प्रमाणे पुढंही चौकशीला सहकार्य केलं जाईल असं कितीही चौकशी केली तरी महाराष्ट्र दिल्लीपुढं आता झुकणार नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.

    follow whatsapp