Narendra Modi: ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत हा आवाज तेलंगणापर्यंत गेला पाहिजे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये (Rajasthan, Madhya Pradesh and Chhattisgarh) भारतीय जनता पक्षाने (BJP) विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मुख्यालयातून भाषण करताना विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. यावेळी त्यांनी काँग्रेसह इंडिया आघाडीवर (India Alliance) टीका करताना, जनतेसाठी आणलेल्या योजनांवर जे पक्ष टीका करतात त्यांना देशविरोधी म्हणत त्यांना कायमच दूर ठेवण्याचे आव्हान त्यांनी मतदारांनी केले.
ADVERTISEMENT
सर्व मतदारांचे आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विजयानंतर विरोधकांवर हल्लाबोल करत मतदारांचे त्यांनी आभार मानले. ज्यांनी देशात भ्रष्टाचार केला, भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीशी उभा राहिले त्यांना सत्तेपासून लांब ठेवण्याचे काम मतदारांना केले आहे. त्यामुळे आता माझ्यावरची जबाबदारी वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी आजच्या भाषणात त्यांनी मतदारांचे आभार मानले.
चार जाती सगळ्यात मोठ्या
राजकारणासाठी विरोधकांनी नेहमीच स्वार्थी राजकारण केले. समाजामध्ये फूट पाडण्यासाठी ज्यांनी जातीचे आणि धर्माचे राजकारण केले त्यांना आता सत्तेपासून मतदारांनीच लांब ठेवले आहे. त्यामुळे जाती धर्मापेक्षा मला आता चार जाती महत्वाच्या वाटतात. त्या म्हणजे महिला शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंब या चार जाती माझ्यासाठी महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र विरोधकांनी जाती धर्माचे राजकारण करून दोन्ही समाजात नेहमीच फूट पाडण्याचे काम त्यांनी केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा >> Katipally Venkat Reddy : माजी आणि भावी मुख्यमंत्र्यांना पाडलं, कोण आहे ‘हा’ भाजपचा ढाण्या वाघ?
2047 मध्ये विकसित राष्ट्र
ज्या मतदारांनी जेवढ्या विश्वासाने आम्हाला विजयी करून दिले आहे. त्या मतदारांना हे मी विश्वासाने सांगू इच्छितो की, 2047 पर्यंत भारत हा विकसित राष्ट्रामध्ये त्याची गणना केली जाईल असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिला. त्यांच्या या विश्वासावरच आगामी निवडणुकीतही आता आमचा विजय नक्की असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.
नारी शक्तीचे आज अभिनंदन
महिला शक्तीचे अभिनंदन करताना त्यांच्यामुळेच आजच्या निवडणुकीत काँग्रेसला सत्तेपासून लांब राहावे लागले. नारी शक्ती हीच खरी आमची ताकद आहे, आणि त्यांच्यामुळे आजचा निकालात भाजप विजयी झाल्याचेही त्यांनी सांगितले. नारी शक्तीचे अभिनंदन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढविला.
काँग्रेसला साफ केले
गेल्या कित्येक वर्षापासून ज्या आदिवासी समाजाला प्रत्येक गोष्टीपासून लांब ठेवले. त्याच आदिवासी समाजाने आता काँग्रेसला राजकारणातून साफ केल्याची जोरदार टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आदिवासी समाजाला विकासापासून आणि राजकारणापासून नेहमीच दूर ठेवले आहे. मात्र भाजपने त्यांच्या विकासासाठी मोठी पाऊलं उचलली आहेत. त्यामुळे आता भाजप नेत्यांची जबाबदारी वाढली असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.
मोदींची शब्द म्हणजे गॅरेंटी
आजच्या निकालावरून हे स्पष्ट झाले आहे की, भारतीय जनता पक्ष म्हणजे गॅरेंटी आहे. त्याच प्रमाणे नरेंद्र मोदी यांचा शब्दही प्रत्येकाला आता गॅरेंटी वाटला पाहिजे. त्यासाठी आता भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केले. नरेंद्र मोदी यांच्या गॅरेंटीची गाडी आता पुढं पुढं गेली पाहिजे कारण आपल्याला देशातील प्रत्येक घटकाचा विकास साधायचा आहे असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
इंडिया आघाडीवर जोरदार प्रहार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर टीका करताना ते म्हणाले की, जी लोकं भ्रष्टाचाऱ्यांसोबत राहिली, त्यांना या निवडणुकीच्यानिमित्ताने मतदारांनी इशारा दिला आहे. विरोधकांच्या घमेंडीवर बोलताना ते म्हणाले की, तुमची घमेंडी ही माध्यमांना नक्की हेडलाईन देतील मात्र जनतेसाठी तुम्ही काहीच देणार नाही. त्यामुळे देशविरोधी असणाऱ्यांना सत्तेपासून लांब ठेवण्याचा सल्लाही त्यांनी मतदारांना दिला आहे.
देशविरोधी ताकदीला बळ देऊ नका
इंडिया आघाडीवर टीका करताना त्यांनी ही शक्ती म्हणजे देशविरोधी ताकद असल्याचा घणाघात त्यांनी विरोधकांवर केला आहे. यावेळी सरकार समाजातील प्रत्येक घटकासाठी योजना आणते आहे मात्र काँग्रेससारख्या पक्षाकडून सातत्याने विरोध केला जात आहे. त्यामुळे अशा देशविरोधी ताकदीला तुम्ही बळ देऊ नका असं आवाहनही त्यांनी मतदारांना केले आहे.
ADVERTISEMENT