अजित पवारांकडून NCP आमदारांना झुकते माप?; फडणवीस म्हणाले, ‘केवळ त्यांनाच…’

प्रशांत गोमाणे

• 02:24 PM • 23 Jul 2023

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थ खात्याची सुत्रे हाती घेताच आमदारांवर भरमसाठ निधी वाटप केला आहे. 25 कोटी किंवा त्याहून अधिक निधी आमदारांना मंजूर करण्यात आल्याचे वृत्त आहे. या सर्व घडामोडीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ajit pawar approves funds for mlas devendra fadnavis reaction maharashtra politics

ajit pawar approves funds for mlas devendra fadnavis reaction maharashtra politics

follow google news

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थ खात्याची सुत्रे हाती घेताच आमदारांवर भरमसाठ निधी वाटप केला आहे. 25 कोटी किंवा त्याहून अधिक निधी आमदारांना मंजूर करण्यात आल्याचे वृत्त आहे. या सर्व घडामोडीवक आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्याच आमदारांना केवळ निधी दिलाय असे म्हणता येणार नाही, तर सर्वच आमदारांना निधी देण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. (ajit pawar approves funds for mlas devendra fadnavis reaction maharashtra politics)

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस नागपूरात पत्रकारांशी बोलत होते.यावेळी अजित पवार यांनी आमदारांना वाटप केलेल्या निधी वाटपावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. केवळ राष्ट्रवादीच्याच आमदारांना निधी दिलेला नाही, तर भाजप-सेनेच्या आणि इतरही काही आमदारांना दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच सगळ्यांना हा निधी दिलेला आहे. त्यामुळे त्यांना केवळ दिलाय असं म्हणणं योग्य होणार नाही, असे देखील फडणवीस म्हणाले आहेत.

हे ही वाचा : PM नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं केलं तोंडभरून कौतुक, अर्थ काय?

दरम्यान अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदारांवर निधीचा वर्षाव केला आहे. 25 कोटी किंवा त्याहून अधिक निधी त्यांनी आमदारांना मंजूर केला आहे. देवळाली मतदार संघातील आमदार सरोज अहिरे यांना तर 40 कोटी मंजूर झाले आहेत. यासाठी विधीमंडळात सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधीच्या विकासकामांसाठी 1500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवारांना सहानुभूती मिळतेय, त्यामुळे आमदारांनी साथ सोडू नये, यासाठी देखील अजित पवारांनी हे निधीवाटप केल्याची चर्चा आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी, शेतीचे नुकसान आणि बचाव कार्यावरही भाष्य केले. ज्या ज्या ठिकाणी इशारा दिला आहे, जिथे अतिवृष्टी होणार आहे अशी आपल्याला सूचना मिळते, तेथे खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे एसडीआरएफ असेल किंवा एनडीआरएफ असेल हे त्या त्या ठिकाणी वेळेत पोहोचत आहेत. आताही ज्या ज्या ठिकाणच्या अलर्ट मिळतात, त्या त्या ठिकाणी आपण प्रशासनाला पूर्णपणे अलर्ट मोडवर ठेवले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हे ही वाचा : Ajit Pawar यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा, शिंदेंची ‘ही’ रिअ‍ॅक्शन.. पडद्यामागे काय सुरू?

शेतीचे नुकसान ज्या ठिकाणी होत आहे, तिकडे आमचे पूर्ण लक्ष आहे. काही ठिकाणी नुकत्याच पेरण्या झाल्या, त्या ठिकाणी नुकसान झाले आहे.त्या संदर्भात जिथे नुकसान होतो तिथे पंचनामे होतात, अस देखील फडणवीस म्हणाले आहेत.

    follow whatsapp