Maharashtra political Latest News : राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच रविवारी अचानक विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदारांसह महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेतली. आमदार आणि काही खासदारांच्या उपस्थितीत ही देवगिरी बंगल्यावर ही बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही राजभवनाकडे रवाना झाले आहेत. महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची स्थिती सध्या दिसत आहे. (Ajit Pawar at raj bhavan after meeting with NCP MLAs )
ADVERTISEMENT
अजित पवार यांनी त्यांच्या देवगिरी या शासकीय बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत काय चर्चा झाली, गोपनीय ठेवण्यात आलं. मात्र, या बैठकीनंतर खरी खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेत्यांसह आमदार राजभवनाच्या दिशेने निघाले.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि इतर नेते राजभवनात दाखल झाले आहेत. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते राजभवनावर पोहोचले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राजभवनात आले आहेत.
राष्ट्रवादीच्या बैठकीला कोण कोण होतं उपस्थित?
खासदार
सुप्रिया सुळे
प्रफुल्ल पटेल
अमोल कोल्हे
आमदार
दिलीप वळसे पाटील
हसन मुश्रीफ
छगन भुजबळ
किरण लहमाटे
निलेश लंके
धनंजय मुंडे
रामराजे निंबाळकर
दौलत दरोडा
मकरंद पाटील
अनुल बेणके
सुनिल टिंगरे
अमोल मिटकरी
अदिती तटकरे
शेखर निकम
निलय नाईक
अशोक पवार
अनिल पाटील
ADVERTISEMENT