Ajit Pawar Baramati assembly election 2024 results live updates: अजित पवार बारामती विधानसभा निवडणूक निकाल 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा असलेला मतदारसंघ हा बारामतीचा आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील या मतदारसंघात पवार वि. पवार असाच सामना रंगला आहे. गेली अनेक वर्ष अजित पवार हे बारामतीचं प्रतिनिधित्व करत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही पवार आमनेसामने आले आहेत.
अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाने युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक अजित पवार यांच्यासाठी अजिबातच सोपी नाही.
हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election Results 2024: Prakash Ambedkar: "...हम सत्ता में रहना चुनेंगे!", निकालापूर्वीच प्रकाश आंबेडकरांनी उडवून दिली खळबळ
कारण, स्वत: शरद पवार हे या निवडणूक प्रचारात उतरले आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना निवडून देत बारामतीकरांनी अजित पवारांना जोरदार धक्का दिला होता. त्यामुळे आताच्या निवडणुकीत बारामतीकर नेमकं कोणाला धक्का देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जाणून घ्या या मतदारसंघात नेमकं काय घडतंय, क्षणाक्षणाचे अपडेट आम्ही आपल्याला देणार आहोत.
हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election Results 2024: Assembly Elections Exit Poll 2024 : सरकार 'यांचं' येणार! 'या' एक्झिट पोलने कोणाची उडवली झोप?
अशाच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण निकाल हे आपल्या mumbaitak.in या वेबसाइटवर पाहता येतील.
ADVERTISEMENT
- 05:54 PM • 23 Nov 2024Baramti Assembly Election Results LIVE: विजयानंतर पाहा अजित पवारांनी काय केलं ट्वीट
- 05:51 PM • 23 Nov 2024Ajit Pawar Baramti Assembly Election Results LIVE: अजित पवार यांचा शरद पवारांना मोठा धक्का
अजित पवार यांच्या विजयाने बारामतीत शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला मोठा धक्का.. अजित पवार यांना या निवडणुकीत 1 लाख 81 हजार मतं मिळाली तर युगेंद्र पवार यांना 80 हजार 233 मतं मिळाली आहेत.
- 05:46 PM • 23 Nov 2024Ajit Pawar Baramti Assembly Election Results LIVE: अजित पवारांचा विजय
अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी तब्बल 1 लाखांहून अधिकच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.
- 09:16 AM • 23 Nov 2024Ajit Pawar Baramti Assembly Election Results LIVE: दुसऱ्या फेरीनंतरही अजितदादाच पुढे
बारामतीत मतमोजणीची दुसरी फेरी पार पडली आहे. ज्यानंतर अजित पवार हेच आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. तर युगेंद्र पवार हे पहिल्या दोन्ही फेऱ्यांमध्ये मागे पडले आहेत.
- 08:48 AM • 23 Nov 2024Ajit Pawar Baramti Assembly Election Results LIVE: अजितदादांना मोठा दिलासा
पोस्टल मतमोजणीत आघाडीवर असलेले युगेंद्र पवार हे ईव्हीएमच्या पहिल्या फेरीत मात्र पिछाडीवर गेले आहेत. त्यामुळे पहिल्याच फेरीत अजित पवार यांनी आता आघाडी घेतली आहे.
- 08:07 AM • 23 Nov 2024Maharashtra Assembly Election Results 2024: पहिल्या कलामध्ये युगेंद्र पवार आघाडीवर
Baramati VidhanSabha Election 2024: बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युगेंद्र पवार हे आघाडीवर असून अजित पवार पिछाडीवर गेले आहेत.
- 07:24 AM • 23 Nov 2024Maharashtra Assembly election results 2024: महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाचा सूर्योदय?
Maharashtra Assembly Election Results 2024: सूर्योदय... महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाचा होणार सूर्योदय, कोणाचा सूर्यास्त? पाहा निकालाचे सगळे लाइव्ह अपडेट फक्त मुंबई Tak वर!
- 06:48 AM • 23 Nov 2024Ajit Pawar Baramti Assembly Election Results LIVE: बारामतीत कोण मिळवणार विजय?
Maharashtra Assembly Election Results 2024: लोकसभा निवडणुकीत बारामतीत मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगला होता. ज्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे.
- 06:46 AM • 23 Nov 2024Maharashtra Assembly Election Results 2024:
Live Updates on Ajit Pawar Baramati Assembly election results: बारामतीत पहिल्यांदाच काका विरुद्ध पुतण्या म्हणजेच अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळत आहे.
- 06:45 AM • 23 Nov 2024Maharashtra Assembly election results 2024: बारामती निवडणुकीचा पहिला कल थोड्याच वेळात येणार हाती
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीत बारामती मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा होती. ज्याचा पहिला कल थोड्याच वेळात येणार आपल्या हाती
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT