NCP: अजित पवारांच्या मतदारसंघाबाबत रोहित पवारांचा गौप्यस्फोट

मुंबई तक

15 Aug 2024 (अपडेटेड: 15 Aug 2024, 09:21 PM)

Rohit Pawar vs Ajit Pawar: अजित पवार हे कर्जत-जामखेड या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

'अजित पवार हे कर्जत-जामखेड या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात'

'अजित पवार हे कर्जत-जामखेड या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात'

follow google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार बारामतीतून निवडणूक लढणार नाहीत?

point

रोहित पवार यांनी अजित पवारांच्या मतदारसंघाबाबत केला गौप्यस्फोट

point

रोहित पवार विरुद्ध अजित पवार अशी होणार लढाई?

Ajit Pawar karjat-jamkhed Vidhan Sabha Election 2024: अहमदनगर: अहमदनगर - बारामती लोकसभा मतदारसंघातून जय पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी होत आहे, परंतु यापूर्वीच अजित पवार यांनी इतर मतदारसंघातून चाचपणी सुरू केली आहे. असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. 'अजित पवारांच्या पक्षाच्या वतीने जी  चाचपणी करण्यात आली त्यात कर्जत-जामखेड मतदारसंघाचाही समावेश आहे. त्यामुळे विरोधी उमेदवार म्हणून अजित पवार यांचे मी स्वागतच करेल.' अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. (ajit pawar can contest assembly elections from karjat jamkhed constituency sensational claim of ncp sp mla rohit pawar)

हे वाचलं का?

अजित पवार कर्जत-जामखेडमधून लढणार?, पाहा रोहित पवार काय म्हणाले?

'कुणाला तिकीट द्यायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. सुप्रिया ताईंच्या विरोधात सुनेत्रा वहिनींना तिकीट देऊन चूक केली असं दादा म्हणत आहे. आता उद्या जाऊन अजून काही वेगळे करतात का हे पाहावं लागेल. बारामतीचा निर्णय हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. शेवटी मतदार ठरवत असतो कुणाला निवडून द्यायचे. त्यामध्ये एकच आहे अजितदादा यांनी 200 कोटी रुपये देऊन डिझाईन बॉक्स नावाची संस्था हायर केली आहे.

हे ही वाचा>> Ajit Pawar: अजितदादांचा 'हा' कोणता डाव?, बारामतीची जागा सेफ करण्यासाठी नवी खेळी?

'ही संस्था राज्यातील विविध मतदारसंघामधून अजित पवार यांच्यासाठी चाचपणी करत आहे. त्यामध्ये कर्जत-जामखेडचाही समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काय होणार हे पहावं लागेल. कर्जत-जामखेड येथील मतदारसंघातील जनतेवर माझा विश्वास आहे. येथील स्थानिक पदाधिकारी विचारासोबत राहतील असा मला विश्वास आहे.' 

'अजितदादांनी जर इथून उमेदवारी घोषित केली तर त्यांचे विरोधी उमेदवार म्हणून स्वागत करू. परंतु निवडणुकीत निर्णय हे नागरिक घेत असतात येणाऱ्या निवडणुकीत अर्थकारण आमच्याकडे कमी असू शकेल, इतर शक्ती आमच्याकडे कमी आहे, गुंडांची ताकद आमच्याकडे कमी आहे. आमच्यासोबत सभ्य आणि प्रामाणिक लोक आहेत.' असा म्हणत रोहित पवार यांनी एक नव्याच चर्चेला तोंड फोडलं आहे.

'अजितदादा आता मुलासाठी काय करताय हे..'

'बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे यामुळे अजित पवार नेमकी निवडणूक कुठून लढवणार यावरही चर्चा सुरू झाल्या आहेत.'

हे ही वाचा>> Ajit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी, अजितदादा मुलासाठी बारामती विधानसभा सोडणार?

'मात्र लोकसभेनंतर बदललेली समीकरण याचाच हा एक भाग असू शकतो जय पवार यांना आमदार द्यावी ही जयच्या कार्यकर्त्यांची मागणी स्वतः अजित पवार यांच्याकडे केली आहे. जयच्या उमेदवाराची मागणी ही कार्यकर्त्यांची आहे सर्वसामान्य जनतेची नाही. त्यामुळे दादा आता मुलासाठी काय करताय हे पाहावं लागेल.' असंही रोहित पवार यावेळी म्हणाले.

    follow whatsapp