मोठी बातमी! अजित पवार गटाचे आमदार थेट शरद पवारांच्या भेटीला, पुन्हा भूकंप?

मुंबई तक

17 Jul 2023 (अपडेटेड: 17 Jul 2023, 11:45 AM)

‘काहीही झालं तरी आपण भाजपला पाठिंबा देणार नाही..’ असं विधान शरद पवार यांनी केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार हे त्यांच्या भेटीसाठी गेले आहेत. तसेच यावेळी त्यांच्यासोबत अनेक आमदार देखील आहेत.

ajit pawar group supporter mla meets sharad pawar y b center mumbai ncp politics

ajit pawar group supporter mla meets sharad pawar y b center mumbai ncp politics

follow google news

मुंबई: राज्याच्या राजकारणात सतत मोठ्या उलथापालथी होत आहेत. 2 जुलै 2023 रोजी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंड केल्यापासून सध्या जोरदार घडामोडी सुरू होत आहे. एकीकडे काल (16 जुलै) अचानक अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या राष्ट्रवादीतील मंत्र्यांनी वाय. बी. चव्हाण सेंटरवर जाऊन भेट घेतली होती. ही भेट पूर्वनियोजित नसल्याने शरद पवार (Sharad Pawar) यांना देखील आश्चर्य वाटलं होतं. मात्र, यावेळी शरद पवारांनी अजित पवार यांच्यासह सर्व मंत्र्यांचं बोलणं ऐकून घेतलं. पण त्यावर त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली नव्हती. असं असताना आज (17 जुलै) पुन्हा एकदा अचानक एक नवी मोठी घडामोड घडली आहे. (ajit pawar group supporter mla meets sharad pawar y b center mumbai ncp politics maharashtra)

हे वाचलं का?

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांसह त्यांचे समर्थक आमदार हे आज थेट शरद पवारांना नुकतेच भेटण्यासाठी गेल्याचं समोर आलं आहे. काही वेळापूर्वीच शरद पवार हे सिल्व्हर ओक या आपल्या निवासस्थानाहून वाय. बी सेंटर येथे पोहचले. तर त्यांच्या पाठोपाठ अजित पवारांचे समर्थक आमदार त्यांच्या भेटीसाठी तिथे दाखल झाले.

हे ही वाचा >> Maharashtra assembly session : राष्ट्रवादीचे आमदार विधानसभेत कुठे बसले?

अजित पवारांनी सलग दोन दिवस शरद पवार यांची भेट घेण्यामागे नेमकं राजकारण काय?

अजित पवार आणि एकूण 9 मंत्री यासह प्रफुल पटेल, सुनील तटकरेंनी कालच शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी या भेटीत शरद पवारांनी या गटाचं नेमकं काय म्हणणं तेवढं ऐकून घेतलं पण त्यांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

हे ही वाचा >> NCP : अजित पवार गटाचा शरद पवारांच्या मनधरणीचा प्रयत्न पुन्हा अयशस्वी

खरं तर या भेटीनंतर शरद पवारांनी अजित पवार यांच्यासमोर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती किंवा प्रतिसादही दिला नव्हता. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीही संभ्रम राहू नये यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना असं म्हटलं की, ‘आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा देऊ शकत नाही. यापुढेही पुरोगामी भूमिका घेऊनच आपल्याला पुढे जायचे आहे.’ असं मत व्यक्त केलं होतं.

म्हणजेच काहीही झालं तरी अजित पवारांनी जी भूमिका स्वीकारली आहे ती आपल्याला मान्य नाही. हेच शरद पवार यांनी एकप्रकारे सांगितलं. दरम्यान, या गोष्टीला 24 तास उलटत नाही तोच अजित पवार यांना समर्थन देणाऱ्या आमदारांनी आता शरद पवार यांची भेट घेण्याचं ठरवलं आहे.

सभागृहात अजित पवारांसमोर नेमके किती आमदार होते हजर?

अजित पवार यांनी 2 जुलैला अचानक बंड केलं. यावेळी त्यांनी एकूण आठ जणांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, असं असलं तरीही अजित पवार यांच्या सोबत नेमके किती आमदार आहे हे अद्यापही पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. खरं तर बंडानंतर अजित पवार आणि त्यांचा गट असं दावा करत होता की, त्यांच्याकडे 40 आमदार आहेत. पण त्यांच्या दाव्यात किती तथ्य आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन हे सुरू झालं आहे. अशावेळी अजित पवार यांच्या पाठिशी किती आमदार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्यासोबत फक्त 15 आमदार असल्याचं आज पाहायला मिळालं. तर शरद पवारांच्या पाठिशी 9 आमदार असल्याचं दिसून आलं. तर तब्बल 28 आमदार हे गैरहजर होते. त्यामुळे या सर्व आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

जर संपूर्ण पक्षावर अजित पवारांना दावा करायचा असेल तर त्यांच्याकडे पक्षाचे दोन तृतीयांश पेक्षा अधिक आमदार असणं गरजेचं आहे. पण आजचं विधासभेतील चित्र हे अजित पवारांसाठी चिंता वाढवणारं आहे. जर दोन तृतीयांश आमदारांची जुळवाजुळव झाली नाही तर मात्र, अजित पवारांना पक्षावर दावा न करता पक्षांतर बंदी कायद्यानुसार दुसऱ्या एखाद्या पक्षात प्रवेश करावा लागेल किंवा एक विधिमंडळात एक वेगळा गट स्थापन करावा लागेल.

    follow whatsapp