Assembly elections 2023 Result Latest Update : राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून पाच राज्यातील निवडणुकीकडे बघितलं जातंय. त्यामुळे या राज्यात कोण ‘सत्ता’धीश होणार, यावर लोकसभेची गणितं आणि प्रचाराची दिशा ठरणार आहे. (Madhya Pradesh Rajasthan Telangana, Chhattisgarh and Mizoram Assembly elections Result 2023)
ADVERTISEMENT
कोणत्या राज्यात कुणाची सत्ता?
पाच राज्यांपैकी काही ठिकाणी काँग्रेस सत्तेत आहे, तर काही राज्यातील सत्ता भाजपकडे आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. मिझोराममध्ये एमएनएफ अर्थात मिझो नॅशनल फ्रंट सत्तेत आहे, तर तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती सत्तेत आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम, तेलंगणा, छत्तीसगढमध्ये कोण आहे मुख्यमंत्री?
अशोक गेहलोत (राजस्थान)
शिवराज सिंह चौहान (मध्य प्रदेश)
के. चंद्रशेखर राव (तेलंगणा)
भूपेश बघेल (छत्तीसगड)
झोरमथांगा (मिझोराम)
ADVERTISEMENT