Baba Siddique Death Inside Story : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाईकवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या हल्ल्याच्या काही तासांतच या हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा तपास सूरू आहे. दरम्यान हा हल्ला कसा झाला होता? आणि या हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम काय आहे? तो इनसाईड स्टोरीतून जाणून घेऊयात. (baba siddique death three accuse fired on baba siddique firing inside story ajit pawar leader shocking crime story)
ADVERTISEMENT
बाबा सिद्दीकी हे साधारण 9.15 ते 9.20 दरम्यान ऑफिस बाहेर पडले होते. त्यावेळेस ऑफीस बाहेर फटाके फोडले जात होते. या दरम्यान अचानक बाईकवरून तीन हत्यारबंद हल्लेखोर तोंडावर रूमाल बांधलेल्या अवस्थेत त्यांच्यासमोर उभे ठाकतात. आणि सिद्दीकी काही कळायच्या आतच त्यांच्यावर धाड धाड तीन चार राऊंड फायर करतात. या गोळीबारात एक गोळी त्यांच्या छातीत लागते आणि रक्ताच्या थारोळ्यात ते खाली कोसळतात.
हे ही वाचा : Who is Baba Siddique: भर रस्त्यात हत्या झालेले बाबा सिद्दीकी नेमके होते तरी कोण?, बॉलिवूडमध्येही...
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजते. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सिद्दीकी यांना लिलावती रूग्णालयात दाखल करतात. मात्र उपचारा आधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
या हल्ल्यात तिघांनी बाबा सिद्दींकींवर गोळीबार केला होता. यापैकी दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर एकजण फरार झाल्याची माहिती आहे. अटकेत असलेल्या दोघांपैकी एक जण हा उत्तरप्रदेशचा आहे तर दुसरा हल्लेखोर हा हरियाणाचा आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहे.
हे ही वाचा : Baba Siddique Death : खळबळजनक! अजित पवारांचे नेते बाबा सिद्दीकींची हत्या, गोळीबारात झाला मृत्यू
अजित पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बाबा सिद्दीकी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचं निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान आहे. झिशान सिद्दीकी, सिद्दकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT