Loksabha Election 2024 : Supriya Sule : Sunetra Pawar : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election 2024) महाराष्ट्राच्या राजकारणात तापमान वाढले आहे. एकीकडे महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या महाविकास आघाडीनेही (MVA) अद्याप अंतिम निकाल सांगितलेला नाही. आता राजकीयवर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा मतदारसंघ बारामतीतील (Baramati) ननंद-भावजयची राजकीय लढाई रंजक ठरत आहे. अशात एक असा प्रकार घडला ज्यामुळे राजकीयवर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Before Loksabha Election supriya sule and sunetra pawar met and hugged amidst political fight Over baramati seat)
ADVERTISEMENT
शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत. त्याचवेळी शरद पवार यांचे पुतणे अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून एकमेकांनविरूद्ध निवडणूक लढवणार आहेत. यादरम्यान, एक रंजक घटना घडली आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची बारामतीत भेट झाली. ही भेट अशी तशी नाही तर, गळाभेट होती. दोघींनी एकमेकींना महाशिवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या. नंनद-भावजय बारामतीजवळील गावात काळेश्वरी मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या, त्यावेळी हा प्रकार घडला.
माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी एका निवेदनात सांगितले की, 'मंदिरात पूजा केल्यानंतर मी सुप्रिया ताईंना भेटले. आम्ही दोघांनी एकमेकांना महाशिवरात्री आणि महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.' सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची मंदिरात झालेली भेट अगदी सामान्य असल्याचे स्पष्ट झाले असले तरी या घटनेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
पुण्यातील इंदापूर तालुक्यातील शेलगाव गावात स्थानिक लोकांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार म्हणाल्या होत्या की, 'तुम्ही आम्हाला संधी दिल्यास आम्ही दोघे (सुनेत्रा पवार-अजित पवार) तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करू, मी तुम्हाला खात्री देते. सुनेत्रा यांनी असंही सांगितलं होते की, जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा त्यांचे पती (अजित पवार) शेतकरी होते आणि ते अजूनही शेतकरी आहेत, परंतु आता ते "शेतकरी राजकारणी" आहेत.'
महाराष्ट्रात अद्याप उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत. मात्र याआधीच सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या मतदारांमध्ये आपला दबदबा वाढवला आहे. त्या सातत्याने लोकसभा मतदारसंघातील लोकांना भेटत आहेत. बैठका घेत आहेत. मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी सुनेत्रा या भागात दौरेही करत आहेत.
सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांवर केलेली टीका
त्याचवेळी खासदार सुप्रिया सुळे याही आपल्या वहिनी सुनेत्रा पवार यांच्यावर सातत्याने निशाणा साधत आहेत. नुकतेच एका प्रचारादरम्यान सुप्रिया यांनी अप्रत्यक्षपणे सुनेत्रा यांना सुनावलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, 'मी तुमची लोकप्रतिनिधी आहे. तुम्ही म्हणाल तेच मला करायचे आहे. महागाई, बेरोजगाई अशा प्रश्नांवर बोलले पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा. तुमच्या सुखदुखात कोण असेल, अशाच लोकांना मतदान करा. मी जी मते मागतेय ती मेरिटवर मागतेय. सदानंद सुळेंना मत मागायला फिरवत नाही. गाव-वाडी-वस्तीवर मी फिरत आहे. माझी खासदारकी ही माझी आहे. यात माझ्या नवऱ्याने लुडबूड करण्याची गरज नाही. माझं आणि सदानंद यांचे तुमच्यासारखेच आहे. त्यांनी मुंबईतले बघायचे आणि मी इथले बघायचे. अशा लोकांना मतदान करा, जो स्वत: सभागृहात उभा राहील,' असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ADVERTISEMENT