Bhajan Lal Sharma New Rajasthan CM : राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाची घोषणा झाली आहे. आणि नेहमीप्रमाणे मोदी-शाह यांनी धक्कातंत्र कायम ठेवत, एका अनपेक्षित उमेदवाराचे नाव मुख्यमंत्री पदी घोषित केले आहे. त्यानुसार आता भजनलाल शर्मा (Bhajan Lal Sharma) राजस्थानचे नवे मुख्यमंत्री (Rajasthan New CM) असणार आहे. भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडल्याने वसुंधरा राजे यांचा पत्ता कट झाला आहे. (bhajan lal sharma will be the new cm of rajasthan vasundhara raje)
ADVERTISEMENT
राजस्थानचा मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी भाजपच्या हायकमांडने केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे याच्यावर दिली होती. त्यानुसार आज दुपारी तिन्ही नेत्यांनी जयपूरला पोहोचून आमदारांची बैठक घेतली. आज दुपारी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची वसुंधरा राजे यांच्याशी वन टू वन बैठक झाली. दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही राजनाथ सिंह यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेनंतर राजस्थानच्या मुख्यमंत्री पदी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
हे ही वाचा : मुंबईत खळबळ माजवणारी घटना, तरुणीकडून लग्नाआधीच झाली चूक; नंतर नवजात मुलीचा..
राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या या शर्यतीत सर्वात आघाडीवर वसुंधरा राजे यांचे नाव होते. वसुंधरा राजे यांनी याआधी सुद्धा राजस्थानची मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे. याशिवाय राजस्थानमध्ये हिंदुत्वाचा पोस्टर बॉय ठरलेले बाबा बालकनाथ यांच्या नावाची देखील चर्चा होती. या नेत्यांसह गजेंद्र शेखावत, सीपी जोशी, दिया कुमारी आणि राजवर्धन राठोड ही नावेही देखील मुख्यमंत्रीपदाची शर्यतीत होती.
शर्यतीत नाव नसातानाही मारली बाजी
विशेष म्हणजे राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत भजनलाल शर्मा यांचे नाव देखील नव्हते, तरी देखील त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. भजनलाल शर्मा हे ब्राम्हण समाजाचे आहेत. आणि त्यांनी राजस्थानच्या सावंगेर मतदार संघातून निवडणूक लढवली होती.
कोण आहेत भजनलाल शर्मा?
भरतपूरचे रहिवाशी असलेले भजन लाल शर्मा राजस्थानच्या सरचिटणीस या पदावर कार्यरत होते. भाजपने त्यांना पहिल्यांदाच जयपूरच्या सांगानेर या सुरक्षित मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले होते. आणि पहिल्याच प्रयत्नात ते विजयी होऊन आमदार बनले होते. भजनलाल शर्मा चार वेळा राज्याचे सरचिटणीस राहिले आहेत. यासोबत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडले गेलेले आहेत.
हे ही वाचा : Ajit Pawar: ‘गोपीनाथ मुंडेंचा वाढदिवस 12 डिसेंबरला नसतो’, अजितदादांनी सांगितलेला ‘तो’ किस्सा जसाच्या तसा…
आमदार अशोक लोहाटी यांचे पक्षाने तिकीट कापून भजनलाल शर्मा यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवले होते. आणि ही निवडणूक जिंकून भजनलाल पहिल्यांदाच आमदार बनले होते. आता त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ देखील पडली आहे. त्यामुळे आता सर्वस्तरावरून आता भजनलाल शर्मा यांचे कौतुक होत आहे.
ADVERTISEMENT