Chandrashekhar Bawankule Devendra Fadnavis : तीन राज्यांत भाजपने दणदणीत विजय मिळवला. मध्य प्रदेशातील सत्ता कायम ठेवतानाच भाजपने राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काग्रेसला पराभूत केले. तीन राज्यातील विजयामुळे महाराष्ट्र भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असे विधान केले आहे.
ADVERTISEMENT
भंडाऱ्यात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय बोलले ते समजून घ्या.
हेही वाचा >> बालमुकुंद ते ओतराम… निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या चार महंतांचं काय झालं?
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, “आजच्या मेळाव्यात पहिला संकल्प करायचा की, नरेंद्र मोदी जेव्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातून महायुतीचे 45 खासदार आणि त्यामध्ये भंडाऱ्याचा खासदार सर्वाधिक मतांनी निवडून येऊन मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी हात वर करून उभा राहिल.”
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील? बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना काय सांगितले?
पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “दुसरा संकल्प आहे 2024 मध्ये जेव्हा विधानसभेच्या ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होतील आणि नोव्हेंबर महिन्याच्या 30 तारखेच्या आत 2024 ते 2029 करता या महाराष्ट्रात पुन्हा नवीन सरकार येईल. या नवीन सरकारमध्ये पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर… काय कळलं सर्वांना? काय ऐकलं? (खालून कार्यकर्ते म्हणाले देवेंद्र फडणवीस). वानखेडे स्टेडियमवर कुणाचा शपथविधी झाला होता? (कार्यकर्ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली पाहिजे). हा आपला दुसरा संकल्प आहे.”
हेही वाचा >> गेहलोतांच्या भूमीत मोदींची ‘जादू’, भाजपने कसा बदलला ‘गेम’?
“महाराष्ट्रात एकच वाघ आहे देवेंद्र फडणवीस. दुसरा कुणी वाघ होऊ शकत नाही. त्यामुळे घोषणा देताना देवेंद्रजींच्याच द्यायच्या. महाराष्ट्राचा एकच वाघ ते म्हणजे देवेंद्र फडणवीस”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
ADVERTISEMENT