Chhattisgarh Exit Poll Result 2023: छत्तीसगडमध्ये काँग्रेस बाजी मारणार, भाजपला बसणार मोठा फटका

रोहित गोळे

30 Nov 2023 (अपडेटेड: 30 Nov 2023, 01:08 PM)

Chhattisgarh Assembly Election Exit Poll Result: पाच राज्यातील निवडणुकीत छत्तीसगडचाही समावेश आहे. ज्यामध्ये काँग्रेस बाजी मारणार की भाजप याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. याच निवडणुकीच्या एक्झिट पोलचे निकाल पाहा एका क्लिकवर.

chhattisgarh assembly election exit poll results 2023 live update

chhattisgarh assembly election exit poll results 2023 live update

follow google news

Chhattisgarh Assembly Election 2023 Exit Poll : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी (Chhattisgarh Assembly Elections 2023) 90 जागांवर दोन टप्प्यात मतदान पूर्ण झाले आहे. आता मुख्यमंत्री भूपेश बघेल हे पुन्हा सत्तेत येणार की भाजप जिंकणार? याची राज्यातील जनता आतुरतेने वाट पाहत आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडेही लोकांना उत्सुकता आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एक्झिट पोलचे निकाल आज म्हणजेच गुरुवार, 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 नंतर जाहीर केले जातील. तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तुम्हाला www.mumbaitak.in वर सर्वात जलद एक्झिट पोलचे निकाल मिळतील.

हे वाचलं का?

LIVE UPDATE:

  • छत्तीसगडमधील निवडणुकीच्या एक्झिट पोलला सुरुवात
  • छत्तीसगडमध्ये भाजपला 36 ते 46 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.
  • तर काँग्रेसला 40-50 जांगा मिळण्याची शक्यता असल्याने काँग्रेसही इथे बाजी मारू शकते.
  • महिला, शेतकरी आणि युवकांसाठी भाजपकडून मोठं अश्वासन
  • दिवाळीच्या ऐन सणामध्येच भाजपकडून महिलांसाठी मोठं अश्वासन देण्यात आले.
  • मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याला भूपेश बघेल यांना 31 टक्के लोकांनी मतदारांनी पसंदी दिली आहे तर 21 टक्के रमन सिंह यांना मतदारांनी पसंदी दिली आहे.
  • तकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन दिल्यामुळे भाजपला पहिली पसंदी मिळू शकते.
  • भाजप आणि काँग्रेसमध्ये 5 जागांचा फरक आहे. त्यामुळे या पाच जागाही महत्वाच्या आहेत.
  • छत्तीसगड आजारी राज्य ही प्रतिमा भाजपकडून बदलण्यात आली. त्यामुळे भाजपला फायदा होण्याची शक्यता
  • गरीबी आणि आर्थिक परिस्थितीनुसार मदतीचे अश्वासन त्याचा फायदा

यावेळी छत्तीसगडमध्ये मतदान कसे झाले?

नोव्हेंबरमध्ये ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, त्यापैकी छत्तीसगड हे एकमेव राज्य आहे जिथे दोन टप्प्यात मतदान झाले. यावेळी 76.31 टक्के मतदान झाले, जे 2018 च्या निवडणुकीत नोंदवलेल्या 76.88 टक्क्यांपेक्षा थोडे कमी आहे. दरम्यान, लोक 3 डिसेंबरची वाट पाहत आहेत, कारण या दिवशी मतपेट्या उघडतील आणि कोणता उमेदवार जिंकेल किंवा हरेल हे देखील ठरवले जाईल. पण त्याआधी आज आपण निवडणुकीचे एक्झिट पोल पाहणार आहोत.

या टीव्ही चॅनेल्स आणि एजन्सींचे सर्वेक्षण चर्चेत

इंडिया टुडे Axis My India
एबीपी-सी वोटर
टाइम्स नाऊ
न्यूज24 टुडे चाणक्या
इंडिया टीव्ही
जी न्यूज
न्यूजएक्स-नेता
रिपब्लिक-जन की बात
सीएसडीएस
न्यूज18-आयपीएसओएस

    follow whatsapp