नागपूर : जिल्ह्यातील 7 तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहे. त्यापूर्वीच काँग्रेस (Congress) नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांनी सावनेर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करत भाजपला (BJP) धक्का दिला आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर, रामटेक, कुही- मांढळ, उमरेड, भिवापूर, मौदा आणि पारशिवनी या 7 ठिकाणी बाजार समित्यांच्या निवडणूक होणार आहेत. त्यापैकी सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागा केदार गटाने बिनविरोध जिंकल्या आहेत. यापूर्वी सुद्धा सावनेर बाजार समितीवर केदार गटाचे वर्चस्व होते ते कायम ठेवण्यात त्यांना यावेळी सुद्धा यश आले आहे. (Congress leader Sunil Kedar has unopposing the election of Agricultural Produce Market Committee in Savner taluka.)
ADVERTISEMENT
नागपूर जिल्ह्यात होणाऱ्या बाजार समिती निवडणूक :
1) सावनेर-बिनविरोध – केदार गट
2) रामटेक- 28 एप्रिल मतदान आणि 29 एप्रिल मतमोजणी
3) कुही- मांढळ- 28 एप्रिल मतदान आणि 29 एप्रिल मतमोजणी
4) पारशिवनी- 28 एप्रिल मतदान आणि 29 एप्रिल मतमोजणी
5) भिवापूर- 13 मे मतदान आणि 14 मे मतमोजणी
6) उमरेड- 13 मे मतदान आणि 14 मे मतमोजणी
7) मौदा- 30 एप्रिल मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी.
“अहो देवेंद्र महाशय, बाकीचे सोडा, पण…”; शिवसेनेने (UBT) चढवला हल्ला
महाराष्ट्र शासनाच्या नव्या नियमानुसार बाजार समितीच्या या निवडणुका होत असून यामध्ये ज्याच्या नावाने 7/12 उतारा असेल तो शेतकरी मतदान करू शकणार आहे. नागपूर जिल्ह्यातील 13 कृषी उत्पन्न बाजार समित्या पैकी 6 बाजार समितीच्या निवडणुका वर्षभर पूर्वी झाल्या आहेत. आता 7 बाजार समितीच्या निवडणूक होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. निवडणुकांचे निकाल आल्यावर जिल्हा उपनिबंधक नोटीस काढतात आणि मग बाजार समिती सभापती, उपसभापती यांची निवड होत असते.
सुनिल केदार विदर्भातील काँग्रेसचा चेहरा?
सुनील केदार यांच्या नेतृत्वात यापूर्वी नागपूर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला यश मिळाले होते. नागपूर जिल्हा परिषदेत सुद्धा सुनिल केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. आता सावनेर बाजार समितीवर सुनिल केदार गटाने बिनविरोध बाजी मारुन केदार यांनी पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
Nana Patole: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार! पाच नावं स्पर्धेत
काँग्रेसमध्ये मोठे फेरबदलाचे संकेत :
वृत्तानुसार महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेता बदलला जाण्याची शक्यता आहे. दिल्लीतील काँग्रेस नेतृत्व राज्यात अध्यक्ष मराठा आणि विधिमंडळ नेता दलित अशा पद्धतीने निर्णय घेऊ शकतात. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर हे बदल केले जाणार असून, नितीन राऊत, बंटी ऊर्फ सतेज पाटील, सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि अशोक चव्हाण यांची नावे प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.
नितीन राऊत यांची नजर विधिमंडळ पक्षनेतेपदावर असली, तरी त्यांचे सुपुत्र कुणाल राऊत महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. दुसरीकडे अशोक चव्हाण यापूर्वीच प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. तर बंटी पाटील यांची अलीकडेच विधान परिषदेतील काँग्रेस नेतेपदी नियुक्ती केली गेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनिल केदार आणि यशोमती ठाकूर यांचं नाव आघाडीवर दिसत आहे.
ADVERTISEMENT