Ajit Pawar: "...त्या दोषींना फाशीची शिक्षा होईल", संतोष देशमुख हत्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान!

मुंबई तक

• 06:04 PM • 21 Dec 2024

Ajit Pawar On Santosh Deshmukh Murder Case:  बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळं संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे

Ajit Pawar On Santosh Deshmukh Murder Case

Ajit Pawar On Santosh Deshmukh Murder Case

follow google news

बातम्या हायलाइट

point

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट

point

"त्यांची संपूर्ण चौकशी व्यवस्थितपणे करून त्या दोषींना..."

point

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar On Santosh Deshmukh Murder Case:  बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळं संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी मोठं विधान केलं. "कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप होणार नाही. जे जे दोषी असतील त्यांची संपूर्ण चौकशी व्यवस्थितपणे करून त्या दोषींना फाशीची शिक्षा होईल, असं अजित पवार म्हणाले. 

हे वाचलं का?

उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?

"सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झालीय. माणुसकीला काळीमा फासणारी घटना तुमच्या माझ्या राज्यात, जिल्ह्यात, या गावात झाली आहे. त्याचं अत्यंत दु:ख आपल्या सर्वांना आहे. यासंदर्भात मी तुम्हाला विश्वास द्यायला आलो आहे की, कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप होणार नाही. जे जे दोषी असतील त्यांची संपूर्ण चौकशी व्यवस्थितपणे करून त्या दोषींना फाशीची शिक्षा होईल. याचा मास्टरमाईंडदेखील कोण असेल, तर त्यालाही सोडलं जाणार नाही, अशी ग्वाही मी सरकारच्या आणि माझ्या वतीनं देतो. या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. लोक चर्चा करत आहेत. यातून कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, या सर्वावर राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारचं बारकाईनं लक्ष आहे, असं मोठं विधान अजित पवार यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन करताना केलं.

हे ही वाचा >> Sandeep Kshirsagar : " वाल्मिक कराडच मास्टरमाईंड...", NCP पवार गटाच्या आमदाराने उडवली खळबळ

अजित पवार पुढे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी कालच आश्वासीत केलं आहे की, यामध्ये दोन प्रकारच्या चौकशा सुरु आहेत. कोणाचाही दबाव येऊ नये, म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फतही तपास करत आहोत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका कुशंका राहू नये म्हणून न्यायाधीशांच्या मार्फतही आपण चौकशी करत आहोत. अशा पद्धतीची चौकशी होत असताना त्यात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत. संतोष देशमुखांची दुख:द अशी घटना घडली, या निमित्ताने त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी काम करत असताना कोणतंही काम अर्धवट सोडत नाही. त्यात संपूर्ण तपास होईपर्यंत व्यक्तीश: मी देखील त्यात लक्ष देईल. अजिबात कोणालाही सोडलं जाणार नाही. या बद्दलचा विश्वास मी गावकऱ्यांना आणि माझ्या सहकाऱ्यांना देतो". 

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराडला सरकार अटक का करत नाही? खासदार निलेश लंकेंनी थेट सांगितलं, म्हणाले...

    follow whatsapp