Devendra Fadnavis : ठाकरे गटाने जनता न्यायालय घेऊन व महापत्रकार परिषद घेत शिंदे गटासह भाजपवर (BJP) ठाकरे गटाच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. तर त्या आधी आमदार अपात्रतेच्या निकालावरून खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटावर टीका केली होती. त्यानंतर आज कराडमधील (Karad) कृषी प्रदर्शनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचे नाव न घेता मुंबईत काही मोकाट रेडे सुटलेत त्यांच्या बंदोबस्तासाठी काही उपाय योजना आहेत का असा सवाल करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
बंडखोरांवर बोचरी टीका
आमदार अपात्रतेच्या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून वारंवार शिंदे गटावर आणि भाजपवर निशाणा साधला जातो आहे. त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस यांनी कराडमधील कार्यक्रमामधून त्यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली होती. याआधी एकनाथ शिंदेंसह त्यांच्या आमदारांनी बंडखोरी केली होती, त्यावेळी राऊतांनीही रेडे म्हणून शिंदे गटाला हिणवले होते, त्यावरून आणि त्यांच्याकडून केली जाणाऱ्या टीकेमुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना टोला लगावला आहे.
हे ही वाचा >> IAS अश्विनी भिडेंसोबत भेदभाव, वर्णद्वेषी वागणूक, ब्रिटिश एअरवेज प्रवासात काय घडलं?
फडणवीसांची विनंती
देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हणाले की, ‘या प्रदर्शनामध्ये 42 लाख रुपयांचा बैल आलेला आहे. त्याच प्रमाणे इथं इलेक्ट्रॉनिक बैलही आलेला आहे. तसेच कृषी प्रदर्शनामध्ये छोटी गाय आलेली आहे. त्यामुळे इथं अनेक गोष्टी पाहायला मिळणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे माझी तुम्हाला फक्त एकच विनंती असणार आहे.
रेडे टीव्हीवर बोलतात
आमच्या मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटलेत. त्यांचा पण काही बंदोबस्त करायची योजना असेल तर सांगा. कारण ते इतकं टीव्ही वर बोलत असतात. त्यामुळे तुमच्याकडे जर काही त्यांच्यासाठी योजना असेल, कुठलं तंत्रज्ञान आलं असेल तर त्याचा उपयोग कसा करता येईल ते या ठिकाणी आम्हाला शिकवा असा सवाल करत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला.
राज्याचा कारभार हातात घ्या
कृषी कार्यक्रमामध्ये यावेळी भाजपचे खासदार उदयनराजेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत देवेंद्र फडणवीस यांनी आता कासरा हातात घेतला आहे, तर त्यांनी आता राज्याचा कारभारही हातात घ्यावा अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. खासदार उदयनराजे यांनी ही इच्छा व्यक्त केल्याने त्यांच्या भाषणाची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
ADVERTISEMENT