‘ठाकरेंचं भाषण नव्हे, ओकारी..’, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

मुंबई तक

• 02:54 PM • 19 Jun 2023

उद्धव ठाकरेंचे कालचे भाषण म्हणजे ओकारी होती. केवढा मळ निघाला, केवढा मळ निघाला, खरं म्हणजे म्हणजे यांची अवस्था अशीच आहे, यांना जळीस्थळी काष्टी पाषाणी मोदी आणि अमित शाह दिसतात,अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवेसेना (UBT)प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

devendra fadnavis criticize uddhav thackeray on bjp kalyan meeting maharashtra politics

devendra fadnavis criticize uddhav thackeray on bjp kalyan meeting maharashtra politics

follow google news

उद्धव ठाकरेंचे कालचे भाषण म्हणजे ओकारी होती. केवढा मळ निघाला, केवढा मळ निघाला, खरं म्हणजे म्हणजे यांची अवस्था अशीच आहे, यांना जळीस्थळी काष्टी पाषाणी मोदी आणि अमित शाह दिसतात,अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवेसेना (UBT)प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली. देवेंद्र फडणवीस कल्याणमधून भाजप मेळाव्यात बोलत होते. (devendra fadnavis criticize uddhav thackeray on bjp kalyan meeting maharashtra politics)

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनापासून वर्धापण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आज मुंबईत वर्धापण दिनाचे दोन कार्यक्रम चालले आहेत. एक कार्यक्रम एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात चाललाय ज्यांनी शिवसेना वाचवली, तर दुसरा वर्धापण दिन ज्यांनी बाळासाहेबांचे विचार बुडवले त्यांच्या नेतृत्वात चालला, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. उद्धव ठाकरे काल म्हणाले, ”तुम्ही आम्हाला लोटलं”.”आम्ही कसलं लोटलं”, ”ती खुर्ची तुम्हाला बोलवत होती”. ”आजा आजा म्हणत होती” , ”त्या खुर्चीला तुम्ही आराहू आराहू म्हणत होतात, अशी खिल्ली देखील देवेंद्र फडणवीस यांनी उडवली.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, भाजप आणि शिवसेनेच्या युतीला पुर्ण बहुमत महाराष्ट्राच्या जनतेने दिले.त्यावेळी तुम्ही भाजपसोबत, हिंदुत्वाकरता आणि महाराष्ट्रात युतीच्या सरकार करता मते मागितली. पण निवडणूक झाली आणि नियत बदलली आणि खुर्चीकरता, त्या ठिकाणी विचारांचा सौदा केला, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. त्यामुळे खरी गद्दारी उद्धव ठाकरे तुम्ही केली, आमच्या सोबत, आमच्या मतांवर, आमच्या पाठीत खंजीर खुपसुन खुर्ची करता कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलात, अशी टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली. पहिली गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली आहे. तुमच्या सहकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे खरे गद्दार तुम्ही आहात. दुसऱ्याला गद्दार म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंचे काल भाषण ऐकले, याला भाषण म्हणावं की ओकारी हा मोठा प्रश्न आहे. ही ओकारी होती, केवढा मळ निघाला, केवढा मळ निघाला, खरं म्हणजे म्हणजे यांची अवस्था अशीच झाली आहे, अशी टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यांना जळीस्थळी काष्टी पाषाणी मोदी आणि अमित शाह दिसतात आणि त्यांना समजतच नाही, रोज आम्ही इतक्या शिव्या देतो, तरीही जनता मोदींची मागे का जाते, असे देखील फडणवीस म्हणाले आहेत.

    follow whatsapp