‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही दिलेले संविधान जिवंत आहे काय?’, शिवसेनेचा (UBT) PM मोदींवर थेट वार

मुंबई तक

14 Apr 2023 (अपडेटेड: 14 Apr 2023, 04:14 AM)

Saamana Editorial: प्रिय बाबासाहेब, तुम्ही दिलेले संविधान जिवंत आहे काय? असा सवाल करत शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

dr babasaheb ambedkar is the constitution you gave alive shiv sena ubt direct attack on pm modi govt

dr babasaheb ambedkar is the constitution you gave alive shiv sena ubt direct attack on pm modi govt

follow google news

Shiv Sena (UBT): मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेनेने (Shiv Sena)(UBT) याच दिवसाच्या निमित्ताने थेट मोदी सरकारवर (Modi Govt) घणाघात केला आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही दिलेले संविधान जिवंत आहे काय?’ असा सवाल करत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर प्रहार करण्यात आला आहे. (dr babasaheb ambedkar is the constitution you gave alive shiv sena ubt direct attack on pm modi govt)

हे वाचलं का?

‘घटनेच्या प्रास्ताविकात फक्त ‘आर्थिक आणि सामाजिक न्याय’ असे म्हटले नसून ‘राजकीय न्याय’ असाही शब्दप्रयोग आहे, पण न्याय जणू मरून पडला आहे. डॉ. आंबेडकर, तुम्ही प्रतिष्ठापना केलेले संविधान नेमके हेच होते काय? प्रिय बाबासाहेब, तुम्ही दिलेले संविधान जिवंत आहे काय?’ असा बोचरा सवाल करत शिवसेनेने केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

    follow whatsapp