भाजपकडून प्रस्थापितांनाच धक्का ! संभाजीनगरमध्ये we support jr चे झळकले बॅनर, चर्चेला उधाण

मुंबई तक

• 04:39 PM • 29 Feb 2024

छत्रपती संभाजीनगरमधील राजकारण अनेक अर्थानं चर्चेला येत असतं, आताही शहरात we support jr चे बॅनर झळकल्यामुळे आगामी निवडणुकीसाठी हा मतदार संघ आणखी चर्चेत येणार आहे. मात्र बाजी कोण मारणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Jeevan rajput

Jeevan rajput

follow google news

बातम्या हायलाइट

point

संभाजीनगरमध्ये we support jr चे झळकले बॅनर

Lok sabha Election 2024: देशासह राज्यात आता  लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. राजकीय पक्षांनीही आपापल्या राजकीय पक्षासाठी कंबर कसली असून आता अनेक इच्छूक उमेदवार निवडणुकीसाठी इच्छूक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांबरोबर नवे उमेदवारही आता निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहत आहेत.

हे वाचलं का?

याच प्रकारचं चित्र आता छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसू लागले आहे. छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, मात्र आता तिथे भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आल्याने तेथील जागेचं नेमकं काय होणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण आता शहरभर we support jr असे बॅनर लागल्याने  अनेक पातळीवर आता चर्चा होऊ लागली आहे. 

हे ही वाचा >> Live : कोणालाही पाठिशी घालणार नाही; अजित पवारांचा इशारा

विश्व हिंदू परिषदेचे डॉ. जीवन राजपूत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ' आगामी काळात होणाऱ्या लोकसभेसाठी आपण इच्छूक असून त्यादृष्टीने वाटचाल चालू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील भविष्यातील राजकारण नेमकं काय असणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचेच नाव प्रामुख्याने घेतले जाते. मात्र काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी मतदारसंघात अपेक्षित चेहरा दिला जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी वक्तव्य केले होते. त्यानंतर अनेक नावांची चर्चा चालू झाली. 
नीलम गोरे यांनी अपेक्षित चेहरा दिला जाण्याची शक्यता वर्तवल्यानंतर मात्र संभाजीनगरमध्ये  we support jr असे शहरभर बॅनर झळकलेले दिसून आले. त्यामुळे हे नेमके जेआर कोण असा सवाल उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.

नीलम गोरे यांनी अपेक्षित चेहरा दिला जाण्याची घोषणा केल्यानंतर मात्र जेआर म्हणजेच जीवन राजपूत यांनी आपल्याही ही निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

we support jr असे बॅनर शहरभर झळकल्याने आता जीवन राजपूतच उमेदवार असणार का असा सवाल अनेकांना पडला आहे. तर त्यावर जीवन राजपूत यांनीही स्पष्टीकरण देत त्यांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांना भेटून आता त्यांनी आपले काम सुरू केले आहे. त्यातच भाजपने अब की बार 400 पारचे नारे लावल्याने संभाजीनगरमधील ही जागा भाजपसाठी महत्वाची असणार आहे.

जे आर नेमके आहेत कोण?

जीवन राजपूत वैजापूर तालुक्यातील असून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. त्याच बरोबर त्यांनी कायद्याचेही शिक्षण घेतले आहे. 1999 पासून ते बजरंग दलाचे आणि विश्व हिंदू परिषदेचे काम करतात. तर 2016 पासून ते विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांनी रुग्णालयाबरोबरच कंपन्या स्थापन करून रोजगाराबरोबरच आरोग्य सेवेवरही त्यांनी भर दिला आहे.

कोविड काळात त्यांनी केलेल्या उपचार आणि रुग्णसेवेमुळे ते चर्चेत आले होते. जीवन राजपूत यांच्या नावाचे बॅनर झळकल्याने आगामी काळात संभाजीनगरमधून नेमकं कोण उमेदवार असणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

एकीकडे जीवन राजपूत यांच्या नावाचे बॅनर झळकले आहेत, तर दुसरीकडे काही दिवसापूर्वी भागवत कराड यांनी भाजपच्या चिन्हावर आपण निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यातच मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे संभाजीनगरच राजकारण बदलण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. त्यामुळे जीआर नावाच्या चर्चेमुळे तर आता संभाजीनगरमधील राजकारण ढवळून निघाले आहे.

ज्या प्रमाणे जे आर म्हणजेच जीवन राजपूत यांच्या नावाची चर्चा चालू झाले, त्याच प्रमाणे आता केंद्रीय मंत्री भागवत कराड, अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, तर विद्यमान खासदार इम्तियाज जलील, गफ्फार कादरी, कदीर मौलाना अशी एकापेक्षा एक दिग्गज नावांची चर्चा सध्या सुरू आहे.  

    follow whatsapp