MLA Disqualification Case, Eknath Shinde Criticize Uddhav Thackeray : आमदार अपात्रतेच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात स्वागत करण्यात आले आहे. या स्वागतानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आमदार अपात्रता निकालावर भाष्य करत ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले आहे. एकाधिकारीशाही, हुकूमशाही, घराणेशाही याचा पराभव झाल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केली आहे. यासोबत कुणालाही मनमानी करता येणार नाही, हे या निकालातून स्पष्ट होत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले आहे. (eknath shinde criticize uddhav thackeray mla disqualification case rahul narwekar vidhan sabha speaker maharashtra politics)
ADVERTISEMENT
आमदार अपात्रतेचा निकालातील कालचा विजय सत्याचा आणि लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच भरत गोगावले हेच मुख्य व्हिप आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आणि धनुष्यबाणावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळेखरी शिवसेना, अधिकृत शिवसेनेलाही मान्यता मिळाल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : Sharad Mohol Murder : शरद मोहोळ खून प्रकरणात पिस्तूल पुरवणारे ‘ते’ दोघे कोण?
आमदार अपात्रतेच्या या निकालातून एकाधिकारीशाही, हुकूमशाही, घराणेशाही याचा पराभव झालाय. आता कुठलीही संघटना कुणालाही स्वत:ची प्रायव्हेट लिमिटेड कपंनी म्हणून चालवता येणार नाही. कुणालाही मनमानी करता येणार नाही, हे या निकालातून स्पष्ट होतं असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हणत ठाकरेंवर हल्ला चढवला.बाळासाहेबांनी ज्या कॉग्रेसचा विरोध केला. त्यांना यांनी (ठाकरेंनी) डोक्यावर, मांडीवर घेतले आणि बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यांना ही ही मोठा चपराक आणि झटका असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान बाळासाहेबांनंतर पक्षात मनमानी समोर आली आहे.एकट्या प्रमुखाने मोठा होऊन पक्ष मोठा होत नसतो. खरं तर आम्ही बाळासाहेबांच्या नावावर पक्षाचे नाव मागितले. पण यांनी बाळासाहेबांच नाव न मागता स्वत:चं नाव पुढे केले, यावरून यांच्या मनात बाळासाहेबांविरोधात काय आदर आहेत, तो दिसून येतो,अशी टीका देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर केली.
ADVERTISEMENT