Eknath Shinde : ठाकरे-फडणवीस लिफ्ट प्रसंगावर शिंदेंचं मोठं विधान,''लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत...''

मुंबई तक

27 Jun 2024 (अपडेटेड: 27 Jun 2024, 05:55 PM)

Eknath Shinde News : बांद्रा ते बांदा कधी पाहिलंय काय? कसं शेतकऱ्यांचं दु:ख कळेल. त्यासाठी शेतात जावं लागेल, चिखल तुडवावा लागतो. फिल्डवर जावं लागतं. घरी बसून सगळ्या गोष्टी कळत नाही. वर्क फ्रॉम चालत नाही, अशी टीका देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर केली.

eknath shinde reaction on uddhav thackeray devendra fadnavis lift meeting incident maharashtra vidhan bhavan

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले म्हणून काही लोक पेढे वाटतायत, असा चिमटा देखील शिंदेंनी यावेळी ठाकरेंना काढला.

follow google news

Eknath Shinde Reaction on Uddhav Thackeray Devendra Fadnavis Meet : राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भेटीचा प्रसंग घडला. या दोन्ही नेत्यांनी विधान भवनातील (Vidhan Bhavan) लिफ्टमधून एकत्र प्रवास केला होता. या संपुर्ण प्रसंगावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणी कितीही लिफ्ट मागितली तरी ती सहाव्या मजल्यापर्यत पोहोचू शकणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्टच सांगितले आहे. (eknath shinde reaction on uddhav thackeray devendra fadnavis lift meeting incident maharashtra vidhan bhavan) 

हे वाचलं का?

एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलत होते. यावेळी ठाकरे-फडणवीस यांच्या लिफ्टमधील भेटीवर शिंदे म्हणाले की, कुणी कितीही लिफ्ट मागितली तर ती सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, आणि ते (ठाकरे) काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्याने आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो, असा टोला देखील शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. तसेच नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले म्हणून काही लोक पेढे वाटतायत, असा चिमटा देखील शिंदेंनी यावेळी ठाकरेंना काढला. 

हे ही वाचा : Uddhav Thackeray : फडणवीसांच्या लिफ्ट भेटीनंतर ठाकरेंचं सूचक विधान

कर्जमाफीवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, बांद्रा ते बांदा कधी पाहिलंय काय? कसं शेतकऱ्यांचं दु:ख कळेल. त्यासाठी शेतात जावं लागेल, चिखल तुडवावा लागतो. फिल्डवर जावं लागतं. घरी बसून सगळ्या गोष्टी कळत नाही. वर्क फ्रॉम चालत नाही, अशी टीका देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर केली.

मुख्यमंत्री पंचतारांकीत शेती करतात, अमावस्या-पौर्णिमेला वेगळं काहीतरी पिक काढतात, अशी टीका ठाकरेंनी शिंदेवर केली होती. या टीकेवर शिंदे म्हणाले की, लंडनमधल्या पंचतारांकीत हॉटेलपेक्षा पंचतारांकीत शेती बरी नाही. शेतकऱ्यांनी चांगली पिके घेऊ नयेत का?  
त्यांच्या डोक्यात अमावस्या पौर्णिमा, लिंबू, मिरचावाले आहेत.  तसेच लेक लाडकी केलं, लाडका भाऊ पण करू, पण बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत? असा टोला देखील शिंदेंनी ठाकरेंना लगावला.

    follow whatsapp