Maharashtra Political News: मुंबई: 19 जून 1966 रोजी अस्तित्वात आलेल्या शिवसेनेच्या (Shiv Sena) स्थापना दिनानिमित्त आज महाराष्ट्रात (Maharashtra) वेगळंच राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या शेवटच्या स्थापना दिवसापासून (19 जून 2022) ते 2023 च्या स्थापना दिवसापर्यंत पक्षाध्यक्ष-मुख्यमंत्री-युती या सगळ्या गोष्टी खूपच बदललं आहे. स्थापना दिनाच्या दुसर्याच दिवशी सुरू झालेल्या बंडखोरीने शिवसेना पक्षाचे आज दोन तुकडे झाले आहेत. (eknath shinde vs uddhav thackeray shiv sena split 1 year chief minister post mva bjp maharashtra political news)
ADVERTISEMENT
शिवसेनेच्या शेवटच्या स्थापना दिवसाच्या दुसऱ्या दिवशी 20 जून 2022 रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान झाले होते. शिवसेनेच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची बातमी समोर आलं होतं आणि त्याच मतदानाने उद्धव ठाकरे आणि त्यांचे सर्वात विश्वासू सहकारी समजले जाणारे एकनाथ शिंदे यांच्यात सर्व काही ठीक नाही.. असंही समोर आलं होतं. विधानपरिषदेत निवडणुकीत मतदान केल्यानंतर एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाले होते.
शिवसेना नेते, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही समजण्याआधीच किंवा ते अॅक्टिव्ह होण्यापूर्वीच एकनाथ शिंदे हे काही आमदारांसह गुजरातच्या सुरतमध्ये निघून गेले होते. एकनाथ शिंदे 43 शिवसेना आणि सात अपक्ष आमदारांसह बंडखोरीचा बिगुल वाजवला. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केली, तर दुसरीकडे शिंदेंसह आमदार सुरतहून थेट गुवाहटीला पोहचले. ज्यानंतर सुरू झालं रिसॉर्ट पॉलिटिक्स आणि शह-काटशह आणि एकमेकांच्या जिव्हारी लागणारी वक्तव्य.
राज्याच्या राजकारणात 56 वर्षे पूर्ण करणारा शिवसेना या पक्षात अभूतपूर्व अशी उलथापालथ पाहायला मिळाली. एकीकडे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद तर गमावलंच पण उद्धव ठाकरे यांच्या वडिलांनी म्हणजेच बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्षही त्यांच्या हातातून गेला. महाराष्ट्राच्या राजकारणात या सगळ्या राजकारणाला आता बारा महिने पूर्ण होत आहेत. शिवसेनेतील बंडखोरीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत पक्ष ताब्यात घेण्यासाठीच्या लढाईपर्यंत गेल्या 12 महिन्यांत शिवसेनेत किती बदल झाला? उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सत्तेचा समतोल कोणाकडे सर्वाधिक आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.
एकनाथ शिंदे यांच्या जवळ शिवसेनेचे नाव-चिन्ह
एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि उद्धव ठाकरेंचं सरकार गेल्यानंतर दोन्ही गट लढत पक्षात आली. दोन्ही गटांनी निवडणूक आयोग गाठून पक्षावर दावा केला. याप्रकरणी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव, निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला देऊन टाकलं. सर्वाधिक खासदार आणि आमदारांचा पाठिंबा असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं होतं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना (UBT) नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती.
शिंदे-उद्धव ठाकरेंकडे किती खासदार-आमदार आहेत?
निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या दाव्याबाबतच्या निर्णयात एकनाथ शिंदे गटाला 2019 मध्ये विजयी झालेल्या शिवसेनेच्या एकूण 55 पैकी 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचेही सांगण्यात आले. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला 15 आमदारांचा पाठिंबा आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या.
शिवसेनेच्या लोकसभा सदस्यांची संख्या 19 वर पोहोचली होती. पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेनेचे 19 पैकी 13 खासदार शिंदे गटासोबत गेले होते. उद्धव ठाकरेंच्या कॅम्पमध्ये लोकसभेचे केवळ 5 सदस्य उरले आहेत. महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभेचे चित्र पाहिल्यास उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर एकनाथ शिंदे यांचे पारडे जड आहे.
हे ही वाचा >> Manisha Kayande: ‘आमदारकीसाठी मी उद्धव ठाकरेंच्या मागे लागली नव्हती, त्यांनीच…’, सगळंच सांगितलं!
विधानसभा-संसदेत शिवसेनेचे कार्यालय कोणाचे आहे?
शिवसेनेच्या फुटीनंतर महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभेत पक्षासाठी दिलेल्या कार्यालयाबाबत देखील एकनाथ शिंदे यांचा गटच भारी पडला. एकनाथ शिंदे गटाला महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभेत शिवसेनेचं कार्यालय मिळालं होतं. तर शिवसेनेचे मुख्य कार्यालय सेना भवन आणि इतर सर्व पक्ष कार्यालये शिवसेनेकडे (UBT) आहेत.
बरोबर 1 वर्षापूर्वी एकत्र, एकाच मंचावर पण आज…
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गोरेगावच्या नेस्को मैदानावर स्थापना दिन साजरा करत आहे, तर शिवसेनेने (UBT) स्थापना दिनासाठी मध्य मुंबईतील सायन येथील षण्मुखानंद हॉलची निवड केली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघेही शिवसेनेचा स्थापना दिवस साजरा करत असले तरी गेल्या वर्षीपेक्षा चित्र पूर्णपणे वेगळे आहे. गेल्या वर्षी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर एकत्र होते. पण यावेळी मात्र वेगवेगळे.
स्थापना दिनाच्या दुसऱ्याच दिवशी बंडाला सुरुवात
शिवसेनेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या सरकारमधील मंत्री आणि पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे हेही व्यासपीठावर उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर सडकून टीका केली होता. शिवसैनिकांमध्येही उत्साह संचारला होता. यावेळी एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले नव्हते. खरं तर त्यावेळी कोणाच्याही मनात नव्हतं की, शिंदे यांच्या मनात जे चालले होतं त्यामुळे संपूर्ण शिवसेनेचा चेहरामोहराच बदलून जाईल याचा अंदाजही कोणीही लावला नव्हता.
हे ही वाचा >> शिंदे-ठाकरेंची मोर्चेबांधणी, पण हर्षवर्धन जाधवांमुळे होणार ‘करेक्ट कार्यक्रम’?
स्थापना दिनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 जून रोजी विधानपरिषदेसाठी निवडणुका झाल्या होत्या. ज्यामध्ये फक्त आमदार मतदान करतात. या मतदानानंतर लगेचच एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेना नेत्यांचा संपर्क तुटला. एकनाथ शिंदे 11 आमदारांसह शेजारील गुजरात राज्यातील सुरत शहरात पोहोचले होते. एकनाथ शिंदे 11 आमदारांसह सुरतमध्ये असल्याच्या वृत्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांची चिंता वाढली होता. शिवसेना आणि उद्धव ठाकरे सक्रिय झाले आणि त्यांनी दुसऱ्याच दिवशी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावून शिंदे यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवलं होतं.
दुसरीकडे एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह गुजरातमधील सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले होते. एकीकडे उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते शिंदे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे बंडखोर आमदारांची संख्याही वाढतच होती. एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये शिवसेनेचे 43 आणि सात अपक्ष आमदारांच्या बैठकीचे फोटो शेअर करून 50 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. शिंदे यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्याची घोषणाही बंडखोर गटाने केली होती. यानंतर सुरू झालेली राजकीय चढाओढ आता अखेरच्या टप्प्यावर आली असून, उद्धव यांच्या हातातून सत्ताच गेली नाही तर त्यांच्याच वडिलांनी स्थापन केलेला पक्षही आता त्यांच्याकडे उरलेला नाही.
ADVERTISEMENT