पाथर्डी : माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले बहीण-भाऊ एका धार्मिक कार्यक्रमात एकत्र आले. यावेळी दोघांनी केलेल्या भाषणांमुळे मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या मुंडे भावा-बहिणींमधील संघर्षाला पूर्णविराम मिळून दोघांमध्ये मनोमिलन झाल्याचे चित्र आहे. याशिवाय भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यातील संघर्षही कमी झाल्याचं बोललं जातं आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात ही एक मोठी घडामोड मानली जात आहे. (Former Minister Pankaja Munde and MLA Dhananjay Munde came together in a religious function.)
ADVERTISEMENT
काय झालं नेमकं?
बीड-अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या भारजवाडी गावात भगवानबाबांनी सुरू केलेल्या परंपरेतील 89 व्या अखंड हरिनाम नारळी सप्ताहाची सांगता झाली. यावेळी पार पडलेल्या किर्तनाला महंत नामदेव शास्त्री, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे तिघेही आवर्जून उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांचे धनंजय मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांच्याशी सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमला महत्व प्राप्त झाले होते. मात्र यावेळी मुंडे भावा-बहिणींनी केलेल्या भाषणांमधून संघर्षाला पूर्णविरम देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं.
शरद पवार-उद्धव ठाकरेंची भेट; संजय राऊतांनी सांगितलं बैठकीत काय घडलं?
काय म्हणाले मुंडे भाऊ-बहिण?
पंकजा मुंडे म्हणाल्या, धनंजय माझा भाऊ मोठा झाला असेल तर मला आनंदच आहे. धनंजयनंतर 4 वर्षांनी माझा जन्म झाला. पण त्याचं काहीतरी कारणही असेल. कुळाचा उद्धार करण्यासाठी एकाला 2 असतील तर काय बिघडतं? दोघेही पराक्रमी आहोत. त्याचा पराक्रम वेगळा, माझा पराक्रम वेगळा, त्याचा स्वभाव वेगळा, माझा स्वभाव वेगळा, त्याचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा आहे. पण शक्ती सारखीच आहे. दोघं एकाच पाठीवरती जन्माला आलो. आमचे भविष्य काही वेगळं असेल. त्यासाठी काही वेळा वाट पाहा, घाई करु नका.
MSC Bank scam case : ईडीने अजित पवार, सुनेत्रा पवारांची नावं आरोपपत्रातून वगळली -सूत्र
यानंतर धनंजय मुंडे बोलताना म्हणाले, या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने आमच्या बहिण-भावाच्या नात्यांमधील काही गज का होईना अंतर कमी झालं. आम्ही दोघं वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या विचारानं काम करतो. आमच्या विचारांमध्ये भले अंतर असेल पण घरामधल्या संवादामध्ये एक तसूभर सुद्धा अंतर नसले पाहिजे, ते अंतर कमी झालं पाहिजे. पण आमचं एक सुईच्या टोका एवढेही वैर नाही. फक्त राजकीय विचाराच्या वाटण्या आहेत, असं म्हणतं दोघांमध्ये जो काही आहे तो राजकीय वाद आहे, असं सांगण्याचा प्रयत्न केला.
तर एकच मंत्री झाला असता… :
धनंजय मुंडे यांचे भाषण सुरु असतानाच, एका व्यक्तीने तुम्ही दोघांनी एकत्र यावं असं म्हटलं. यावर ते म्हणाले, जे होतं ते बऱ्यासाठी होतं असं म्हणतात. कारण पंकजाताई दोन वेळेस आमदार राहिल्या. त्या मंत्री झाल्या. तसंच मीही आमदार झालो, विरोधी पक्ष नेता झालो आणि मंत्रीही झालो. जर असं झालं नसतं तर दोघांपैकी कोणीतरी एकच मंत्री झाला असता, असं तुम्ही समजून घ्या, असं सांगतं दोघांमधी राजकीय गणित सर्वांसमोर खुली केली.
Maharashtra politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? अंजली दमानियांची स्फोटक पोस्ट
मी ‘त्या’ पायरीचा दगड :
पंकजा मुंडे यांनी यावेळी भाषणात मी भगवानगडाची पायरी आहे, यापेक्षा जास्त माझी लायकी नाही, असं म्हटलं. यावर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे पायरी असेल तर आपण त्या पायरीचा दगड आहे, असं म्हणतं दोघांमध्ये वाद नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. तसंच मोठा भाऊ म्हणून लहान बहिणीने भगवान गडासाठी जे करायला सांगितलं आहे ते करणार अशी ग्वाहीही धनंजय मुंडे यांनी दिली.
ADVERTISEMENT