Chhagan Bhujbal: ‘कुणबी प्रमाणपत्र देणं चुकीचं’, मराठा आरक्षणावर भुजबळांचं खळबळजनक विधान

रोहित गोळे

• 01:47 PM • 06 Nov 2023

Chhagan Bhujbal ‘मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र देणं चुकीचं आहे’, असं थेट विधान करत छगन भुजबळ यांनी राज्यातील त्यांच्याच सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

giving kunbi certificate to maratha community people is wrong chhagan bhujbal sensational statement on maratha reservation

giving kunbi certificate to maratha community people is wrong chhagan bhujbal sensational statement on maratha reservation

follow google news

Chhagan Bhujbal on Maratha Reservation: बीड: ‘एकीकडे पोलिसांना हतबल करायचं आणि दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र (kunbi certificate) फटाफट सर्व मार्गाने द्यायचं हे काही बरोबर आहे असं काही मला वाटत नाही. हे सगळं चुकीचं होत आहे.’, असं भुवया उंचावणारं विधान शिंदे सरकारमधील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं आहे. बीड दौऱ्यावर असताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा समाजाला (Maratha Aarakshan) थेट कुणबी प्रमाणपत्र देण्यावर सपशेल आक्षेप दिला आहे. तसंच मराठा समाजाला कुणबी प्रमाणप देणं चुकीचं असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. (giving kunbi certificate to maratha community people is wrong chhagan bhujbal sensational statement on maratha reservation)

हे वाचलं का?

मराठा समाजाच्या आरक्षणावर छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

‘आज आरक्षण संपवण्याचं काम हे राज्यात सुरू आहे. असं नाही की, मराठा समाजासाठी सांगताना तुम्ही सांगता की, तीन न्यायमूर्तींची कमिटी नेमली. अरे तुम्ही सगळ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देत आहात. मग ती समिती काय करायची आहे आता? तुम्ही बॅकडोअर एंट्री देत आहात.. तुम्ही फ्रंटडोअर एंट्री द्या कायद्याने.. सुप्रीम कोर्टात अडलेलं आहे तिथून घ्या ना तुम्ही आरक्षण. पण तुम्हाला बॅकडोअर एंट्री द्यायची आहे.’

‘मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं चुकीचं’

‘सगळ्यांनाच दुकानं आता.. सगळ्या जिल्ह्यांमध्येच या-या आणि घ्या-घ्या.. कोणत्याही समाजाचा असेल तर वडिलांचं आजोबांचं असे सगळे पुरावे मागितले जातात. आता मात्र लगेच मिळालं.. त्यात ते वंशावळ.. म्हणजे एकाला मिळालं तर त्याचे जेवढे काही नातेवाईक आहे ते आपोआपच आले कुणबी.. पण हे कायद्याच्या विरुद्ध आहे. महाराष्ट्र हा सर्व समाजाचा आहे. यशवंतराव चव्हाणांनी सांगितलेलं की, महाराष्ट्र हा मराठी आहे.’

हे ही वाचा >> Manoj Jarange: CM शिंदे एकटे पडले, लढले अन् जिंकले… जरांगेंसोबतच्या ‘त्या’ फोन कॉलची Inside Story

‘राज्यकर्त्यांना सांगायचं आहे तुम्ही याचा विचार करा.. लोकांना काही कळत नाही अशातला काही भाग नाही. एकीकडे पोलिसांना हतबल करायचं आणि दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र फटाफट सर्व मार्गाने द्यायचं हे काही बरोबर आहे असं काही मला वाटत नाही. हे सगळं चुकीचं होत आहे.’ असं मोठं विधान छगन भुजबळांनी केलं आहे.

‘ओबीसींची मतं नको का तुम्हाला?’

‘मी मगाशी सांगितलं की, यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आलं आहे. 54 टक्के ओबीसी त्यात 27 टक्के आरक्षण.. त्यात व्हीजेएनटी आहेत. एवढा मोठा समाज जो आहे त्याचा आरक्षण संपविण्याचा घाट या सगळ्या दिवसात घातला जात आहे. त्याला वेगवेगळ्या स्तरावरचे लोक जबाबदार आहेत. अगदी मंत्रालयापासून ते खालपर्यंत..’

‘या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की, तुम्ही आवाज तरी उठवा.. पण आज एवढी दहशत निर्माण झाली आहे की, लोकं घाबरत आहेत. तुम्ही आमदारांची घरं-दारं जाळता म्हटल्यावर कोण त्यात बोलणार मग?’

‘जे अशा प्रकारची निर्णय घेत आहेत त्यांना मला विचारायचंय.. तुम्हाला ओबीसींची मतं नकोयेत? मतांची सगळं घडत असेल तर ओबीसीसाठीही 50-60 वर्षांची लढाई झाली आहे. ज्यामध्ये 54 टक्क्यांपेक्षा जास्त लोकं आहेत. त्यांची मतं नकोत तुम्हाला?’ असं इशाराच एक प्रकारे छगन भुजबळ यांनी मराठा नेत्यांना यावेळी दिला आहे.

‘मला धमक्या दिल्या जातात…’

‘मला धमक्या दिल्या जात आहेत.. मराठा समाजाने भुजबळांना मतं देता कामा नये. ओबीसी समाज सुद्धा अशाप्रकारचे विचार करू शकेल. हे विसरू नका.. जर ओबीसींना सर्वच बाजूने छळायचं असेल, ओबीसी नेत्यांवर हल्ले करायचे असतील तर हा विचार वाढीला लागू शकतो.’

हे ही वाचा >> Fact Check: पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला करणाऱ्यांमध्ये मनोज जरांगे होते का?

‘माझी मागणी आहे.. ती अशी आहे की, जातीगणना करा.. ती मागणी सगळ्याच नेत्यांची आहे. ओबीसी किती आहेत आणि कोण किती आहेत ते कळू द्या. बिहारमध्ये जातीगणना केली तर तिकडे 63 टक्के निघाली. तर 54 टक्क्यांच्या खाली जाणं शक्यच नाही. मी कुठल्या जातीचं प्रतिनिधित्व करत नाही. मी सगळ्या ओबीसींचं नेतृत्व करतोय.’ असंही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

‘जी घरं जाळलीत त्यात लहान लेकरं बाळं नव्हती का?’

‘मी कधी आरक्षणातून शिकलो नाही, ना माझी मुलं ना आणखी पुढे.. ते म्हणतात त्यांची लेकरं-बाळं.. अरे लेकरं बाळं सगळ्यांचीच आहेत ना.. जी घरं जाळलीत त्यात लहान लेकरं बाळं नव्हती का? त्यावेळेला कोणी विचार केला नाही. माझ्याकडे फोटो आहे दाखवू शकतो मी.. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली. हा काय प्रकार आहे?’

‘शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि हे असं करायचं. हे कोणी सांगितलं तुम्हाला.. हे काय आहे?’

‘माझं असं म्हणणं आहे की, ही जी वेळ आहे ओबीसी समाजाची.. सगळ्या घटकांनी आपला आक्रोश मांडला पाहिजे. आमचे अधिकार आहेत.. मला पुढे सांगायचं आहे की, ज्यांची घरं जळाली आहेत त्यांना सुद्धा शासनाने मदत केली पाहिजे आणि त्यांना सुद्धा दिलासा देण्याचं काम महाराष्ट्र शासनाची आहे.’ असं म्हणत छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरून झालेल्या हिंसाचाराबाबत तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

    follow whatsapp