PM Narendra Modi wealth: नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला होता. 2014 पासून ते सतत देशाच्या सत्तेची धुरा सांभाळत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजप 2024 लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का की, पंतप्रधान मोदींना नेमका किती पगार मिळतो आणि त्यांच्याकडे किती प्रॉपर्टी आहे? (how much is pm modi wealth what does he have and where does he earn from)
ADVERTISEMENT
पंतप्रधानांना मिळतो ‘एवढा’ पगार
लोकांना त्यांच्या पंतप्रधानांबद्दल जाणून घेण्याबाबत नेहमीच उत्सुकता असते. आपल्या देशाच्या पंतप्रधानांकडे काय आहे? त्यांची घरं कुठे आहेत, त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे, त्यांनी कुठे गुंतवणूक केली आहे? असे अनेक प्रश्न देशातील नागरिकांना पडलेले असतात.
दरम्यान, याच प्रश्नांपैकी काहींची उत्तरं आता समोर आली आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान कार्यालयाने (PMO Office) याबाबत संपूर्ण माहिती जारी केली होती.
हे ही वाचा>> Sharmistha Mukherjee :”सोनिया गांधी मला पंतप्रधान करणार नाही”, गांधी कुटुंबाबद्दल गौप्यस्फोट
प्रथम देशाच्या पंतप्रधानांच्या पगाराबद्दल आपण जाणून घेऊया, भारताच्या पंतप्रधानांचा पगार वर्षाला सुमारे 20 लाख रुपये आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यांचा मासिक पगार हा सुमारे 2 लाख रुपये आहे. मूळ वेतनाव्यतिरिक्त, पंतप्रधानांना मिळणाऱ्या पगारामध्ये दैनिक भत्ता, खासदार भत्ता आणि इतर अनेक भत्ते समाविष्ट असतात.
पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्च 2022 पर्यंतच्या एकूण जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील PMO कार्यालयाने 2022 मध्ये जाहीर केला होता. त्यानुसार त्यांच्याकडे एकूण 2.23 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पीएमओच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीवर नजर टाकली तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वाधिक 2.23 कोटी रुपयांची संपत्ती बँक खात्यांमध्ये (Bank Accounts) जमा आहे.
पंतप्रधानांकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही
पीएमओच्या माहितीतून समोर आलेली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. गुजरातमधील गांधीनगर येथे त्यांच्या मालकीची जमीन होती, जी त्यांनी दान केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ऑक्टोबर 2002 मध्ये निवासी जमीन खरेदी केली होती. तिसरा साथीदार म्हणून त्यांचा यात सहभाग होता. परंतु, स्थावर मालमत्तेचा सर्व्हे क्रमांक 401/A वर आता त्यांच्याकडे कोणतेही मालकी हक्क नाहीत, कारण या जमिनीतील आपला हिस्सा त्यांनी दान केला आहे.
हे ही वाचा>> Nawab Malik : अजित पवारांचा कॉल, शरद पवारांना धक्का; मलिक महायुती बरोबर?
पंतप्रधान मोदींकडे स्वतःचे कोणतेही वाहन नाही
एका अहवालानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोणत्याही प्रकारचे बाँड, (Bond) स्टॉक (Stock) किंवा म्युच्युअल फंड (MF) मध्ये कोणतीही गुंतवणूक नाही. याशिवाय त्यांच्याकडे स्वत:चे कोणतेही वाहन नाही. तथापि, मार्च 2022 पर्यंतच्या मालमत्तेच्या आकडेवारीनुसार, त्याच्याकडे निश्चितपणे 1.73 लाख रुपयांच्या चार सोन्याच्या अंगठ्या होत्या. जर आपण बचतीबद्दल बोललो तर, पोस्ट ऑफिसमध्ये 9,05,105 रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (NSC) आणि 1,89,305 रुपयांची जीवन विमा पॉलिसी आहे.
ADVERTISEMENT