विरोधकांच्या इंडिया आघाडीची नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर इंडिया आघाडीने देशभरात जाहिर सभा घेण्याची घोषणा केली होती.त्यानुसार या सभेची सुरुवात ऑक्टोबरमध्ये मध्यप्रदेशच्या भोपाळमधून होणार होती. पण आता अचानक ही सभा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान ही सभा रद्द होण्यामागचं नेमकं कारण काय? हे जाणून घेऊयात.(india alliance madhya pradesh bhopal rally has been cancelled kamal nath shivraj singh chauhan)
ADVERTISEMENT
दिल्लीतील इंडिया आघाडीची बैठक पार पडल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी वेणुगोपाल यांनी पत्रकार परीषद घेतली होती.या पत्रकार परिषदेत वेणुगोपाल यांनी, इंडिया आघाडीची पहिली सभा मध्य प्रदेशच्या भोपाळ या शहरात आयोजित करण्यात आलीय. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही सभा होईल, अशी माहिती दिली होती. पण वेणुगोपाल यांनी इंडिया आघाडीच्या पहिल्या सभेची घोषणा केल्यानंतर अवघ्या तीन दिवसात ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा :Satara: पुसेसावळीत तरुणाचा गेला हकनाक जीव, काळीज कातरणारा कुटुंबीयांचा हंबरडा
खरं तर इंडिया आघाडीची पहिली सभा रद्द होण्याच्या वृत्ताला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि पीसीसी प्रमुख कमलनाथ यांनी दुजोरा दिला आहे. कमलनाथ यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, भोपाळमध्ये इंडिया आघाडीची रॅली आयोजित केली जात नाही आहे. ती रद्द करण्यात आली आहे. पत्रकारांनी विचारले असता त्यांनी दोनदा रॅली रद्द झाल्याचा पुनरुच्चार केला.
मध्य प्रदेश निवडणूक प्रभारी रणदीप सुरजेवाला यांना माध्यमांनी सभा रद्द झाल्याबद्दल विचारणा केली होती.यावर सुरजेवाला म्हणाले, आमची चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेंणार आहोत, त्यानंतर रॅलीचा निर्णय होईल, अद्याप काहीही अंतिम नाही, असे त्यांनी सांगितले.
इंडिया आघाडीची सभा रद्द होण्याच्या वृत्तावर मुख्यमंत्री शिवराज सिंह म्हणाले की, मध्य प्रदेशच्या नागरिकांमध्ये काँग्रेसविरोधात रोष आहे. हा रोष सभेत प्रकट होणार तर नाही ना, अशी त्यांना भीती आहे. त्यामुळे इंडिया आघाडीने सभा रद्द केली आहे. जनतेचा आक्रोश हा इंडिया आघाडीच्या विरोधात आहे”, अशी टीका शिवराज सिंह यांनी केली.
हे ही वाचा :Reservation: ‘OBC आरक्षणात नवीन वाटेकरी येऊ देणार नाही’, फडणवीसांचं मोठं विधान
‘या’ कारणामुळे सभा रद्द
स्टॅलिनचा पक्ष द्रमुक हा देखील इंडिया विरोधी आघाडीचा एक भाग आहे. त्यात उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलनी डेंग्यू-मलेरिया सारख्या आजाराशी केली होती. त्यामुळे काँग्रेसही सनातनकडे त्याच मानसिकतेने पाहते का, असा प्रश्न थेट काँग्रेसला पडला.या एका प्रश्नामुळे संपूर्ण वातावरण भाजपच्या बाजूने निर्माण होऊ लागले, त्यामुळे काँग्रेसची पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण झाली की आघाडी करण्याऐवजी आधी स्वतःची स्थिती सुधारावी.
दरम्यान कमलनाथ यांनी अनेकवेळा स्वतःला सनातनी आणि हनुमानाचा भक्त असे वर्णन केले आहे. अनेक धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. आता इंडिया आघाडीच्या रॅलीमुळे या सर्व मेहनतीला फटका बसणार हे उघड आहे. त्यामुळे रॅली रद्द झाल्याची माहिती खुद्द कमलनाथ यांनीच दिली आहे.