Jitendra Awhad Ajit Pawar Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना उल्लेख न करता सुनावले आहे. आव्हाडांनी एकीकडे अजित पवारांवर बाण डागले आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. (MLA Jitendra Awhad praised Chief Minister Eknath Shinde, but criticized Ajit Pawar)
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पत्रकारांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याच कार्यक्रमाचा संदर्भ देत जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट लिहिली आहे.
अजित पवारांना टोले; जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
"परवा महायुतीतील एका मोठ्या नेत्याने पत्रकारांना जेवण दिले. यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये, मुख्यमंत्री पैसे खर्च करून निवडणुका जिंकत आहेत, असा आरोप करीत सरकारच्या माध्यमातून विविध योजना जाहीर करायला लावतात. मात्र, त्यासाठी पैशांची उपलब्धता होत नाही. दिल्लीतील एक दिवसाच्या वास्तव्यात आपण भाजपच्या सर्वोच्च नेत्यांना हे सांगिल्याचे समजते तसेच अनेक विवादस्पद मुद्दे त्यांनी पत्रकारांशी अनौपचारीक रित्या शेयर केले."
हेही वाचा >> ठाकरेंचं ठरलं! विधानसभेला 'इतक्या' जागा लढणार?
शिंदेंचे जितेंद्र आव्हाडांनी केले कौतुक
"मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक सांगू शकतो की, हा माणूस जेवढे पैसे कमवत असेल-नसेल, याबद्दल मला काही बोलायचे नाही. पण, जे पैसे त्यांच्या हातात येतात; ते पैसे मोकळेपणाने वाटायला एकनाथ शिंदे कधीच मागेपुढे पहात नाहीत, हे ! १९९७ -९८ पासून पहातोय. जेव्हा त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. आजही ते तसेच करतात, हे त्यांच्या मित्रपरिवाराशी चर्चा केल्यावर दिसते."
हेही वाचा >> "कुणी काय केलं सगळं माहितीये", क्रॉस व्होटिंगवर आमदाराने सोडलं मौन
"दुसरीकडे मात्र नेत्यांना आलेला पैसा लॉकरमध्ये ठेवायचा असतो किंवा त्यातून नवीन जमिनी आणि कारखाने यातच घालवायचा असतो; निवडणुकांसाठी खर्च करायचा नसतो. एकनाथ शिंदे निवडणुकांसाठी खर्च करतात आणि जिंकतात. तुम्ही खर्च करीत नाही अन् हरता. मग, दोष एकनाथ शिंदेंना कशाला द्यायचा, दोष स्वतःच्या स्वभावाला द्या", असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसू नका, आव्हाडांचा पवारांना टोला
आव्हाडांनी पुढे म्हटले आहे की, "पण, हा त्या नेत्याचा स्वभावच आहे. कारण, त्या नेत्याला युती-आघाडीत रहायची सवयच नसते. मी म्हणेन, तेच खरे! अशीच त्यांची भूमिका असते. कुठल्याही आघाडीत किंवा युतीमध्ये असे चालत नाही. मिळून-जुळवून घ्यायचे असते. पण, हे त्यांच्या स्वभावात नाही; मुख्यमंत्र्यांबद्दल एवढाच राग असेल तर बाजूला बसू नका", असा टोला आव्हाडांनी अजित पवारांना लगावला आहे.
ADVERTISEMENT