Jitendra Awhad on Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोल्हापूरात सभा घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्याच नेत्यांचे अंतर्गत वाद सुरु झाले आहेत. कालच्या सभेनंतर आता मुश्रीफ-आव्हाड हा वाद उफाळून आल्याने आमदार जितेंद्र आव्हाडांनी मंत्री हसन मुश्रीफांनी (Hasan Mushrif) मी विकासासाठी तिकडे गेलो असं म्हटले होते. त्यावर बोलताना त्यांनी म्हटले की, गेल्या 18 वर्षांपासून मंत्रिपद उपभोगणाऱ्या मुश्रीफांनी इतकी वर्षे केले आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे भविष्यात आता मुश्रीफ-आव्हाड हा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
ADVERTISEMENT
आव्हाडांनी मुश्रीफांना घेरले
शरद पवार यांच्याबरोबर आमदार जितेंद्र आव्हाडही कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर त्यांनी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देत हसन मुश्रीफांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. त्यावर आज बोलताना जितेंद्र आव्हाडांनी आज हसन मुश्रीफांना पुन्हा एकदा आपल्या शैलीत उत्तर दिले.
हे ही वाचा >> Sharad Pawar on Saroj Patil : “डॉक्टरांना तू जरा रागव…” बहिणीने थेट शरद पवारांकडे का केली तक्रार
हे म्हणणं किती हास्यस्पद
कोल्हापूरात राष्ट्रवादीचा एकही प्रस्थापित नेता नसतानाही ही सभा व्ही. बी. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे मोठी सभा घडवून आणली त्यामुळे येथील नेत्यांच्या मनात धडकी भरली असल्याची खोचक टीका जितेंद्र आव्हाडांनी मुश्रीफांवर केली. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हसन मुश्रीफ हे गेल्या 18 वर्षांपासून मंत्री आहेत. मात्र आज ते सांगतात की, मी विकासासाठी तिकडे गेलो हे म्हणणं किती हास्यस्पद आहे. ते जर आता विकासासाठी तिकडे गेलो असं म्हणत असतील तर 18 वर्षे मंत्रीपदावर बसून त्यांनी काय केलं असं प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला.
साहेबांनी सगळं दिलं…
यावेळी जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या टीका करताना हसन मुश्रीफांचा सगळा राजकीय प्रवासच वाचून दाखवला. ते म्हणाले की, साहेबांनी त्यांना सगळं दिल्यानंतर वयाच्या 83 व्या वर्षी त्यांना त्रास देणं शोभलं का असा सवालही आव्हाडांनी त्यांना केला आहे. शरद पवार कोल्हापूरला आले की, त्यांच्या गाडीत बसायचे कोण आणि त्यांच्या गाडीतून लोकांना कोण उतरवायचे असा खोचक सवालही त्यांनी केला.
हे ही वाचा >> Nawab Malik: मलिक अजितदादा की पवार गटात? नवाब मलिकांच्या मुलीचं मोठं विधान
कोल्हापूरी चप्पल…
कोल्हापूरात झालेल्या सभेमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचे माझ्या भाषणात नावही घेतले नाही. मग त्यांना एवढा राग येण्याचं कारण काय असा सवाल करुन त्यांनी 18 वर्षाच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. जितेंद्र आव्हाडांनी बोलताना कोल्हापूरी चप्पलचे उदाहरण दिले होते, त्यांच्या त्या टीकेला उत्तर देताना हसन मुश्रीफांनी कापशी चप्पलावरुन त्यांना टोला लगावला होता.
ADVERTISEMENT