Maharashtra Assembly Session Live Updates : मंत्रीपद का दिलं नाही? सुधीर मुनगंटीवारांनी थेट सांगितलं, म्हणाले...

मुंबई तक

16 Dec 2024 (अपडेटेड: 16 Dec 2024, 05:00 PM)

Maharashtra Assembly Winter Session Live Updates : राज्याच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. कालच नागपुरात महायुतीच्या 39 मंत्र्यांचा शपथविधी काल पार पडला. यामध्ये काहींचा पत्ता कट झाला तर काही नव्या लोकांना संधी मिळाली. त्यानंतर अजूनही गृहखातं कुणाला मिळणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. तर आज अधिवेशनात काय चर्चा होणार यावर राज्याचं लक्ष असणार आहे.

nitin gadkari big statement on sudhir mungantiwar chandrapur lok sabha election 2024 shilajeet chandrapur rajura rally

''सुधीर मुनगंटीवार जर निवडून आले, तर त्यांच्यामागे मोदी आणि माझे भक्कम इंजिन उभे राहील.

follow google news

Maharashtra Assembly Winter Session Live Updates : राज्याच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परभणीमधील घटनांवर तसंच बीडमधील संतोष देशमुख प्रकरणावर सभागृहात काय चर्चा होणार यावर सर्वांचं लक्ष असणार आहे. 

कालच नागपुरात महायुतीच्या 39 मंत्र्यांचा शपथविधी काल पार पडला. यामध्ये काहींचा पत्ता कट झाला तर काही नव्या लोकांना संधी मिळाली. त्यानंतर अजूनही गृहखातं कुणाला मिळणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. 

महाराष्ट्रातील सर्व घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत राहा... 'मुंबई Tak'

  • 06:05 PM • 16 Dec 2024
    Maharashtra Politics Live Updates : मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही! विजय शिवतारे संतापले, नेमकं काय म्हणाले?

    "शेवटपर्यंत नाव होतं, अचानक कट झालं. त्यामुळे नाराजी निश्चित आहे. त्यामागची कारणमीमांसा मी पाहिली. महाराष्ट्रात कर्तृत्व, काम चालायचं, प्रातं चालायचे, विभागवार प्रतिनिधित्व द्यायचे. पण आता आपण बिहारकडे चाललोय. जातीयवादाच्या राजकारणामुळे बिहारचा विकास झाला नाही. आपण सगळे मिळून तिकडेच चाललो आहोत. माझ्यासाठी मंत्रिपद महत्त्वाचं नाही. माझी कामे महत्त्वाची आहेत. मला लोकांनी निवडून दिलं आहे. विभागीय नेतृत्व दिलं जायचं. उपयुक्त लोकांच्या हातात सत्ता देत महाराष्ट्र आम्ही पुढे नेला होता. आपण कुठेतरी पाठीमागे चाललोय", असं विजय शिवतारे म्हणाले.

  • 04:58 PM • 16 Dec 2024
    Maharashtra Politics Live Updates : मंत्रीपद का दिलं नाही? मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

    "मी कधीच व्यथित होत नाही. पक्ष मला जे पद देतो, त्या पदासाठी मी काम करतो. मंत्रिमंडळात माझं नाव आहे, असं सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं. एवढाच मुद्दा आहे. कालपर्यंत नाव असताना ते का काढण्यात आलं, ते मला माहित नाही. बाकी मला याबद्दलची कोणतीही माहिती नाही. मी व्यथित नाही. कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून मी गोरगरिबांचे विषय मांडायचो. आता विधानसभेत मांडणार आहे. तुमचं नाव अचानक का काढण्यात आलं? वरिष्ठांशी काही बोलणं झालं आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं आहे की, तुमच्यासाठी वेगळी जबाबदारी ठेवली आहे, यावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले, हा मग तेच खरं..सर्व त्यांनाच माहित असणार आहे. नितीन गडकरींच्या भेटीवर मुनगंटीवार म्हणाले, मोठ्या भावाची छोट्या भावासोबत असणारी भेट आहे. जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात, तेव्हा तेव्हा मी त्यांचे मार्गदर्शन घेतो", असं मुनगंटीवार म्हणाले.

  • 11:33 AM • 16 Dec 2024
    Maharashtra Politics Live Updates : "परभणी आणि बीडच्या घटनांमुळे राज्यात हाहाकार"

    आज स्थगन नाहीये हे मला माहिती आहे. पण राज्यात बीड आणि परभणीत घडलेल्या घटना या सरकार आल्यानंतर घडल्या आहेत. काल परभणीमध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता मृत्यूमुखी पडला असं नाना पटोले म्हणत असतानाच राहुल नार्वेकर यांनी आज शोकप्रस्ताव आहेत, स्थगन नसणार असं म्हटलं. पुढे पटोले म्हणाले, बीडच्या घटनेमुळे राज्यात हाहाकार माजला आहे. ही गंभीर बाब आहे, राज्यात लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने यावर भूमिका मांडावी असं पटोले म्हणाले. 

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, संविधानाचा अपमान कोणीच करु नये. ज्याने अपमान केला, तो मनोरुग्ण आहे. त्याच्यावर कारवाईही झाली आहे. अशी एखादी घटना घडल्यानंतर संविधानिक पद्धतीनं प्रतिक्रिया उमटल्या पाहिजेत. विरोधी पक्षानेही राजकारण न करता, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भूमिका घेतील असं फडणवीस म्हणाले.

  • 10:32 AM • 16 Dec 2024
    Maharashtra Politics Live Updates : बीडच्या डिघोळ अंबामध्ये रास्तारोको, संतोष देशमुख प्रकरणावरुन आक्रमक


    बीड जिल्ह्यातील डिघोळ अंबा येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणी येथील न्यायालयीन कोठडीत झालेला युवकाचा मृत्यू या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ डिघोळ अंबा येथील गामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन कर्त्यांकडून सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी पोलीस प्रशासनाला ग्रामस्थांच्या वतीने मागण्याचे निवेदन देण्यात आले. वाहनांच्या दोन्ही बाजुंनी रांगा लागल्या होत्या.

  • 10:03 AM • 16 Dec 2024
    Maharashtra Politics Live Updates : अजित पवारांच्या किती आमदारांना मंत्रिपद?

    राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी

    1. हसन मुश्रीफ
    2. धनंजय मुंडे
    3. दत्तात्रय भरणे
    4. आदिती तटकरे
    5. माणिकराव कोकाटे
    6. नरहरी झिरवाळ
    7. मकरंद पाटील
    8. बाबासाहेब पाटील
    9. इंद्रनील नाईक (राज्यमंत्री)
  • 09:43 AM • 16 Dec 2024
    Maharashtra Politics Live Updates : भाजपने 'या' मंत्र्यांचा पत्ता केला कट

    भाजपने 'या' मंत्र्यांचा पत्ता केला कट

    1. सुरेश खाडे
    2. विजयकुमार गावित
    3. रवींद्र चव्हाण
    4. सुधीर मुनगंटीवार

    भाजपने चार दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही. ज्यापैकी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव नसणं हे अनेकांसाठी धक्कादायक असल्याचं बोललं जात आहे. कारण सुधीर मुनगंटीवार हे राज्यातील भाजपमधील बडं प्रस्थ मानलं जात होतं. मात्र, त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान न देऊन फडणवीसांनी सूचक असा संदेशही दिला आहे.

  • 09:15 AM • 16 Dec 2024
    Maharashtra Assembly Session Live Updates : पहिल्या दिवशी कोणते मुद्दे गाजणार?

    राज्याच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परभणीमधील घटनांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये काय चर्चा होणार यावर सर्वांचं लक्ष असणार आहे, बीडमध्ये संविधानाच्या प्रतिकृती विटंबना केल्यानंतर काही दिवसांपासून वातावरण तणावपूर्ण आहे. तर दुसरीकडे बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर काहीसं तणावाचं वातावरण आहे. या मुद्द्यावरुनही आमदार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

     

follow whatsapp