Maharashtra Breaking News : वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई तक

12 Sep 2024 (अपडेटेड: 12 Sep 2024, 11:28 AM)

Maharashtra Live News : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स तसंच हवामानाचा अंदाज 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या सर्व फक्त एका क्लिकवर...

Mumbaitak
follow google news

Maharashtra breaking news in marathi : विधानसभा निवडणुकीपूर्वी आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यामुळे सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महायुतीत जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदावरुन राजकारण सुरु झाले आहे.

तसेच महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. घरोघरी विराजमान झालेल्या लाडक्या बाप्पाचे आज विसर्जन होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षातील पदाधिकारी एकमेकांवर टीका करत असल्याने या बैठकीला महत्त्व आहे. उद्यय सामंत आणि दादा भुसे देखील बैठकीला उपस्थित होते.

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

लाइव्हब्लॉग बंद

  • 11:24 AM • 12 Sep 2024
    Maharashtra News : वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

    वनराज आंदेकर खून प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

    समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असलेला फरार आरोपी सागर पवार याला अटक

    तर साहिल दळवी हा पोलिसांच्या ताब्यात

    तपासामध्ये ३ पीस्टल व ३ जिवंत राऊंड जप्त

    आत्तापर्यंत एकूण ८ पिस्तल आणि १३ राऊंड, ७ दुचाकी, एक क्रेटा कार जप्त,

    आरोपी संगम वाघमारे यास १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत वाढ

    आजपर्यन्त ३ अल्पवयीन आरोपीसह एकूण २१ आरोपी ताब्यात

     

  • 10:30 AM • 12 Sep 2024
    Maharashtra News : एकनाथ शिंदेंकडून वांद्रे-वरळी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार वांद्रे-वरळी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण

    धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील महत्वाचा टप्पा असलेला हा पूल आहे

    दुपारी 2 वाजता बिंदु माधव ठाकरे चौक, वरळी, या ठिकाणी या पुलाचे लोकार्पण होणार आहे

    तर दुपारनंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक व अध्यक्ष Prof. Klaus Shwab यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर मुंबई महानगर प्रदेश (एम.एम.आर) ला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याबाबत निती आयोग अहवाल प्रकाशन समारंभ आयोजित करणार

     

follow whatsapp