Maharashtra Breaking News : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई तक

19 Sep 2024 (अपडेटेड: 19 Sep 2024, 05:53 PM)

Maharashtra Live News : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स तसंच हवामानाचा अंदाज 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या सर्व फक्त एका क्लिकवर...

Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey joined the Congress in the presence of Mumbai Congress chief Varsha Gaikwad and other leaders

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

follow google news

Maharashtra breaking news in marathi : विधानसभा निवडणुकीपूर्वी आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यामुळे सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महायुतीत जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदावरुन राजकारण सुरु झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने बैठकीत ‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

पुण्यात तिसऱ्या आघाडीची आज पुन्हा बैठक आहे. वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट निवडणूक होणार का? अशी तुफान चर्चा रंगली आहे. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाने समीकरणे बदलली. भाजपचे जगदीश मुळीक पण महायुतीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. बापू पठारे यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे.

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

लाइव्हब्लॉग बंद

  • 05:50 PM • 19 Sep 2024
    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. 

  • 04:45 PM • 19 Sep 2024
    मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

    वैद्यकीय पथकाकडून मनोज जरांगे यांची आरोग्य तपासणी पूर्ण झालीय. आज मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे. सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केलीय. दरम्यान आज जरांगे यांना ताप आला असून त्यांची शुगर देखील कमी झाली असल्याची माहिती मनोज जरांगे यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी दिलीय. यावेळी वैद्यकीय पथकातील डॉक्टरांनी जरांगे यांना उपचार घेण्याचा सल्ला दिलाय, मात्र उपचार घेण्यास मनोज जरांगे यांचा नकार पाहायला मिळत आहे. जरांगे यांनी जर अन्न पानी न घेतल्यास त्यांच्या किडणीवर सूज येऊ शकते, हृदयावर सूज येऊ शकते असं डॉक्टर म्हणालेत. 

  • 12:03 PM • 19 Sep 2024
    Maharashtra News : महायुतीची जागावाटपात आघाडी? किती जागांचं फायनल झालं?

    महायुतीमध्ये जागावाटपाबाबत हालचालींना वेग आला आहे. 288 पैकी काही जागांवर महायुतीचं फायनल ठरलं आहे. या कोणत्या जागा आहेत. तसंच ज्या जागा फायनल झालेल्या नाही त्यांचं गाडं कुठे अडकलं आहे आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार याबाबत चर्चा

  • 12:02 PM • 19 Sep 2024
    ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्यासह 6 जणांचे आमरण उपोषण

    ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्यासह 6 जणांचे आमरण उपोषण सुरू. अंतरवाली सराटी गावात सुरूय ओबीसी नेत्याचे आमरण उपोषण. सरकारने कोणत्याही प्रकारचे हैद्राबाद, सातारा किंवा मुंबई गॅझेटीयर लागू करू नये. जर सरकारने कोणतेही गॅझेट लागू केले तर त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत असं मंगेश ससाणे यांनी म्हटलं आहे.

     

  • 12:01 PM • 19 Sep 2024
    Maharashtra News : रूपाली चाकणकर यांना बाप बदलणं सोपं- रोहिणी खडसे

     

    “रूपाली चाकणकर यांना बाप बदलणं सोपं आहे. आधी पवार साहेबांसोबत होत्या. नंतर सुप्रिया सुळे. ज्या जनतेने सर्व दिलं, त्या जनतेच्या होऊ शकत नाहीत, त्या आपल्या काय होतील?” असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. ‘माझ्या वडिलांचा वारशावर मी सध्या काम करते, याचा मला अभिमान आहे’ असं रोहिणी खडसे म्हणाल्या.

     

  • 10:33 AM • 19 Sep 2024
    मोदी यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं? संजय राऊत यांचा खोचक सवाल

    मोदी यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं? ते अर्थमंत्री कधी झाले? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला. याआधी निवडणूक झालेल्या आहेत. घटनेनुसार याआधी या गोष्टी झालेल्या आहेत, त्यांनी नवीन घटना लिहू नये अशी टीकाही राऊत यांनी केली.

     

  • 10:32 AM • 19 Sep 2024
    Maharashtra News : संविधानातील मार्गदर्शक तत्वं बदलत आहेत – संजय राऊत

    संविधानातील मार्गदर्शक तत्वं बदलली जात आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केला.

    आमचा वन नेशन वन इलेक्शनला पूर्णतः विरोध आहे. देशाच्या विरोधात असणारी ही कृती आहे. देशाच्या दृष्टीने याचा काहीही फायदा नाही, असे ते म्हणाले.

     

follow whatsapp