PM नरेंद्र मोदी आजपासून UNITED STATES दौऱ्यावर, किती दिवसांचा असणार दौरा? पाहा VIDEO

मुंबई तक

20 Sep 2024 (अपडेटेड: 21 Sep 2024, 09:03 AM)

Maharashtra Live News : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स तसंच हवामानाचा अंदाज 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या सर्व फक्त एका क्लिकवर...

PM Modi अमेरिकेला रवाना. (फाइल फोटो)

PM Modi अमेरिकेला रवाना. (फाइल फोटो)

follow google news

Maharashtra breaking news in marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवस यूनायटेड स्टेट्सच्या (Unites States) च्या दौऱ्यावर जाणार आहेत. मोदी संयुक्त राष्ट्रांच्या क्वाड लिडर्स (QUAD Leaders) समिट आणि समिट ऑफ द फ्यूचर (SOTF) मध्ये सहभागी होणार आहेत. राजकीय पटलावर हा दौरा महत्त्वाचा मानला जात असून मोदी द्विपक्षीय बैठकांमध्ये सहभाग घेणार आहेत. 

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

लाइव्हब्लॉग बंद

  • 09:16 AM • 21 Sep 2024
    Manoj Jarange Strike : बीड जिल्ह्यात कडकडीत बंद! मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला देणार पाठिंबा 

    Monoj Jarange Patil Latest News Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मागील पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी, हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅझेट लागू करावे, अंतरवाली सराटीसह राज्यात मराठा आंदोलनाच्या निमित्ताने दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जावे, अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून मराठा समाज अंतरवाली सराटीकडे रवाना होणार असल्याचे मराठा समन्वयक यांच्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले असून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आहेत.

  • 09:05 AM • 21 Sep 2024
    PM नरेंद्र मोदी आजपासून UNITED STATES दौऱ्यावर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवस यूनायटेड स्टेट्सच्या (Unites States) च्या दौऱ्यावर जाणार आहेत. मोदी संयुक्त राष्ट्रांच्या क्वाड लिडर्स (QUAD Leaders) समिट आणि समिट ऑफ द फ्यूचर (SOTF) मध्ये सहभागी होणार आहेत. राजकीय पटलावर हा दौरा महत्त्वाचा मानला जात असून मोदी द्विपक्षीय बैठकांमध्ये सहभाग घेणार आहेत. 
     

     

  • 04:00 PM • 20 Sep 2024
    Maharashtra news : मी मरेपर्यंत या पक्षाचे नाव बदलणार नाही- रामदास आठवले

    अनेकानी नावे बदलली मी मरेपर्यंत या पक्षाचे नाव बदलणार नाही असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे. कायद्याने जातीयता गेली आहे असे सांगत त्यांनी रत्नागिरीत कविता सादर केली.

     

  • 12:49 PM • 20 Sep 2024
    Maharashtra news : श्रीकांत शिंदे यांच्या जनसभा यात्रेचा तिसऱ्या टप्पा

    शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचा जनसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा पार पाडत आहे. यात मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत आजी – माजी खासदार, आमदार, नगरसेवक, शिवसेना विभाग स्तरावरील पदाधिकारी, विधानसभा स्तरावरील पदाधिकारी, उपविभाग स्तरावरील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

     

  • 12:48 PM • 20 Sep 2024
    Maharashtra news : Balasaheb Thoreat यांचा दावा, Uddhav Thackeray यांच्या पक्षाकडून काँग्रेसला थेट वॉर्निंग

    सध्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. सोबतच, मविआच्या विविध नेत्यांकडून खासकरुन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे दावे करण्यात येत आहेत. कालच बाळासाहेब थोरातांनी याबाबत एक अतिशय मोठा दावा केलाय. त्यामुळेच, आज ठाकरे गटाकडून संजय राऊतांनी काँग्रेसला थेट वॉर्निंग दिलीय. 

  • 11:57 AM • 20 Sep 2024
    Maharashtra news : शरद पवार गटाची थोड्याच वेळात अंतर्गत बैठक, काय खलबतं ?

     

    शरद पवार गटाची थोड्याच वेळात अंतर्गत बैठक होणार असून जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे या उपस्थित राहणार आहेत. पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर ही बैठक होईल.

     

follow whatsapp