Maharashtra Assembly Election 2024 Live : उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना धक्का, 'या' नेत्याचा शिवसेना युबीटीत प्रवेश

मुंबई तक

22 Oct 2024 (अपडेटेड: 22 Oct 2024, 02:57 PM)

Maharashtra Live Updates : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

Uddhav thackeray, ajit pawar, maharashtra assembly election

उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना धक्का,

follow google news

Maharashtra Assembly Election 2024 LIVE : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय मोर्चेंबाधणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. भाजपने रविवारी आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यानंतर आता पुढे काय घडणार कोण कोणत्या जागांवर आपले उमेदवार जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर मोठ्या प्रमाणात सुरु आहेत.

महाविकास आघाडीचं जागावाटपही अद्याप झालेलं नाही. तसंच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भूमिकाही महत्वाची ठरत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरण्यासाठी म्हणजेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसीलनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर... 

  • 02:56 PM • 22 Oct 2024
    उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना धक्का

    रत्नागिरी जिल्ह्यातील अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते अजित यशवंतराव यांनी आज त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, उपनेते आमदार राजन साळवी तसेच पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते

    अनेकजन आमच्याकडे येऊ इच्छित आहेत पण त्यांना तिकीट पाहिजे. पण विदाऊट तिकीट आल्यामुळे माझी जबाबदारी आहे की तुमचा पुढचा प्रवास सुखकर झाला पाहिजे. अनेकांनी आपल्या चिन्हाचा संभ्रम निर्माण करून देखील याच मशालवर चिन्हावर आपले नऊ खासदार लोकांनी निवडून दिलेत. त्यामुळे हे मशाल चिन्ह आहे ते सर्वांपर्यंत पोहोचलेल आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. 

     आपल्याकडचा उमेदवार कोण हे सांगण्याची गरज नाहीये. कठीण काळात अनेक जण आपल्या सोबत राहिले म्हणून आपण ही लढाई लढतोय.त्यांच्याकडे सत्ता आहेत त्यांच्याकडे एजन्सी आहेत पण माझ्याकडे जीवाला जीव देणारी माणस आहेत. त्याच जोरावर मी ही लढाई लढायला मैदानात उतरलोय.  जिथे जिथे मशाल पोचली नसेल तिथे सर्वांनी मशाल पोचवा,असे आवाहन देखील ठाकरेंनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. 
     

  • 02:05 PM • 22 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 : हाती तुतारी घेत, संदीप नाईक यांचा भाजपला राम राम! 

    माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी भाजपला राम राम करत हाती तुतारी घेतली आहे. त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

  • 12:18 PM • 22 Oct 2024
    Maharashtra News: उद्या कुडाळच्या मैदानात सभा असून तिथेच शिंदे गटात प्रवेश करणार- निलेश राणे

     

    “उद्या कुडाळच्या मैदानात सभा असून तिथेच शिंदे गटात प्रवेश करणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक मी जिंकणार,” असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला.

     

  • 11:46 AM • 22 Oct 2024
    Maharashtra Election 2024 : ठाकरे गटाकडून आतापर्यंत किती उमेदवार निश्चित?

    तिढा नसलेल्या जागावर संबंधित उमेदवाराला लढण्यासंदर्भात तयारीचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहेत. ठाकरे गट महाविकास आघाडीत 96 ते 98 जागांवर लढणार असल्याची सूत्रांची माहिती. त्यापैकी 86 जागावरील इच्छुक उमेदवारांची यादी ठाकरे गटाकडून निश्चित करण्यात आली आहे. 86 मतदार संघातील ज्या मतदार संघात एकापेक्षा जास्त इच्छुक आहेत, त्यांचा सर्वे करून उमेदवारांना मातोश्रीवर बोलवण्यात येत असून त्यांना सूचना दिल्या जात आहेत. अशा पद्धतीने आतापर्यंत एकूण 53 जणांना उमेदवारी निश्चितीबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत.

     

  • 11:46 AM • 22 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 : आमदार सतीश चव्हाण शरद पवार गटात प्रवेश करणार

    आमदार सतीश चव्हाण यांचा शरद पवार गटात प्रवेश निश्चित झाला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी तुतारी हाती घेण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे सतीश चव्हाण यांचा प्रवेश लांबला होता. मात्र अखेर हा प्रवेश निश्चित झाला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या राजीनामे देण्याच्या धमकीमुळे सतीश चव्हाण वेटिंगवर होते. मात्र एक ते दोन दिवसात सतीश चव्हाण यांचा प्रवेश निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.

     

  • 11:45 AM • 22 Oct 2024
    Maharashtra News: अजीत पवार आणि अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत गाणं लाँच

    पैलवान या चित्रपटाच्या गाण्याचं अजीत पवार आणि अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत लाँचिंग… अजीत पवार यांचे खाजगी सचिव अजित सोलवट यांचंही या चित्रपटातून केलंय पदार्पण… काही वेळात अनेक पैलवानांच्या उपस्थितीत गाणं होणार प्रदर्शित

     

     

  • 11:44 AM • 22 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 : शिंदे, फडणवीस, अजित पवारांकडून पैशांचं वाटप सुरु – संजय राऊत

    'शिंदे, फडणवीस, अजित पवारांकडून पैशांचं वाटप सुरु आहे. फक्त 5 कोटी रुपये जप्त झाले, 10 कोटी रुपये सोडून दिले. 30-30 कोटी सुद्धा आता लवकरच वाटप करतील. सांगोल्याच्या गद्दार आमदारांसाठी रोकड जात होती.' असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.

     

follow whatsapp