Maharashtra Assembly Election 2024 LIVE : ठाकरे गटाने सुधीर साळवींना उमेदवारी नाकारली, शिवडीत बंडाचा झेंडा फडकणार?

मुंबई तक

25 Oct 2024 (अपडेटेड: 25 Oct 2024, 10:24 PM)

Maharashtra Election Live Updates : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

Sudhir Salvi Latest News

Sudhir Salvi Latest News

follow google news

Maharashtra Assembly Election 2024 LIVE News and Updates in Marathi : राजकीय पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा मुख्य सामना आहे. त्यात दोन्ही आघाड्यांमधील सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. फक्त काही जागांवर अजूनही तिढा आहे. 

त्याचबरोबर, माजी आमदार, दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे सुपूत्र झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. महायुतीमध्ये वांद्रे पूर्वच्या जागेचा तिढा सुटला असून आता इथून झिशान सिद्दीकी महायुतीचे उमेदवार असतील. काही दिवसांपूर्वी झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगवर संशय आहे. झिशान सिद्दीकी हे काँग्रेस पक्षात होते. त्यांनी 2019 साली काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक जिंकलेली.

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर... 

लाइव्हब्लॉग बंद

  • 10:26 PM • 25 Oct 2024
    सुधीर साळवींना उमेदवारी नाकारली, शिवडीत होणार राजकीय उलथापालथ?

    आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवडी मतदारसंघात विद्यमान आमदार अजय चौधरी यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आलीय. सुधीर साळवी आणि अजय चौधरी यांच्यात तिकीटासाठी रस्सीखेच सुरु होती. परंतु, उद्धव ठाकरे यांनी सुधीर साळवींची उमेदवारी नाकारून अजय चौधरींना तिकीट दिलं. त्यामुळे शिवडी मतदारसंघात साळवींच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे सुधीर साळवी पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकवतात का? असा सवाल राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.
     

  • 07:04 PM • 25 Oct 2024
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चौथी यादी घोषित, मनसेनं 'या' नेत्यांना दिली संधी

    राज्याच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून येत्या 20 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातच मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तत्पूर्वी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पाच उमेदवारांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. गणेश भोकरे (कसबा पेठ), गणेश बरबडे (चिखली), अभिजीत राऊत कोल्हापूर उत्तर, रमेश गालफाडे (केज), संदीप उर्फ बाळकुष्ण हुटगी (कलीना) या उमेदवारांनी मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी संधी मिळाली आहे. 

  • 05:01 PM • 25 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 : भायखळ्यात मशाल vs धनुष्यबाण! यामिनी जाधवांविरोधात 'या' नेत्याची उमेदवारी जाहीर

    भायखळ्यातून ठाकरे गटाकडून मनोज जामसूतकांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याआधी शिवसेना शिंदे गटाकडून यामिनी जाधव यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. आता त्यांच्याविरूद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून मनोज जामसूतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
     

  • 05:00 PM • 25 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : शिंदे गटाचे मिलिंद देवरा आदित्य ठाकरेंविरोधात फुंकणार रणशिंग

    राज्याच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून शिवसेना ठाकरे गटाकडून वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. शिंदे गटानेही त्यांचे उमेदवार जाहीर केले असून मिलिंद देवरा आदित्य ठाकरेंविरोधात या मतदारसंघात रणशिंग फुंकणार आहेत. शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकल्यानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगला आहे. आता या निवडणुकीत कोण बाजी मारतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 03:29 PM • 25 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : शिवसेना शिंदे गटाचा 'हा' नेता माढ्यातून अपक्ष लढणार!

    एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत माढ्यातून अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत. महायुतीच्या जागा वाटपात माढा मतदार संघ अजितदादा गटाकडे गेल्याने सावंत बंडखोरी करणार आहेत. २९ ऑक्टोबर रोजी सावंत माढ्यातुन अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

     

  • 02:38 PM • 25 Oct 2024
    Ajit Pawar News : 'दलबदलू लोकांवर...', अजित पवारांची हर्षवर्धन पाटलांवर घणाघाती टीका!

    'दलबदलू लोकांवर कोण विश्वास ठेवेल. हर्षवर्धन पाटलांनी साखर कारखाना अडचणीत आणला. हर्षवर्धन पाटलांना राज्यपाल नियुक्त आमदार करणार होतो. आमच्यात मॅच फिक्सिंगचा प्रकार नसतो. मी कधीच अदृष्य काम केलं नाही', असं म्हणत अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर निशाणा साधला. 

  • 02:28 PM • 25 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार-उदय सामंत

     

    महायुतीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार. माझी लाडकी बहीण योजना सूर्य चंद्र असे पर्यंत सुरु राहणार.कोकणातल्या 15 मतदार संघातील आमचे उमेदवार निवडून येतील. महाराष्ट्रात युतीचं सरकार गरजेचं आहे, असं उदय सामंत म्हणाले.

     

  • 02:27 PM • 25 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : आदित्य ठाकरे यांनी केले आहे अत्यंत मोठे विधान

     

    माझा पहिला फॉर्म भरून मी सर्व प्रथम वैशाली सूर्यवंशी यांचा फॉर्म भरण्यासाठी आलोय. काही लोक सुरतला पळून गेले गुहावटीला पळून गेले. पन्नास खोके एकदम ok शिवसैनिकांची घोषणाबाजी

     

  • 12:12 PM • 25 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : नागपूर- देवेंद्र फडणवीस आज भरणार अर्ज

    भाजपचे नेते, देवेंद्र फडणवीस आज नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे औक्षण केलं.  केंद्रीय मंत्री नेते नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीचे अनेक नेतेही फडणवीस यांच्यासोबत आहेत.

     

  • 12:09 PM • 25 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : महाविकासाआघाडीत मेरीटवर जागावाटप – विजय वडेट्टीवार

    महाविकासआघाडीत जागांचा तिढा नाही. आज रात्री हायकमांडकडून यादी जाहीर करण्यात येईल. महाविकासाआघाडीत मेरीटवर जागावाटप केले जात आहे. अहेरी मतदारसंघात काही प्रमाणात वाद आहे. पण तेथील कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

     

  • 10:35 AM • 25 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दिग्गज नेत्यांचा पक्ष प्रवेश!
    • माऊली कटके यांनी दोन दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला… शिरूर विधानसभा मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी असा होणार सामना…

    • त्याचबरोबर, संजय काका पाटील, निशिकांत पाटील, सना मलिक यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश. निशिकांत पाटील यांना सांगली इस्लामपूरमधून, संजय काका पाटील यांना तासगावमधून तर सना मलिक यांना चेंबूर अणूशक्ती नगर येथून उमदेवारी देण्यात आली आहे.
    • माजी आमदार, दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे सुपूत्र झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. 
  • 10:16 AM • 25 Oct 2024
    वंचित बहुजन आघाडीतर्फे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून संतोष पवार यांना उमेदवारी जाहीर

    वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संतोष पवारांना ए. बी फॉर्म देण्यात आला… वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार दिल्याने दक्षिण सोलापूरची निवडणूक चौरंगी होणार आहे.. संतोष पवार हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत….

     

  • 10:13 AM • 25 Oct 2024
    Maharashtra Election 2024 : अजित पवार यांची दुसरी यादी एका क्लिकवर वाचा...

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) आज दुसरी यादी जाहीर केली आहे. अजित पवारांच्या पक्षानेही दुसरी यादी जाहीर करत निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पहिल्या यादीत अजित पवारांनी 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आता 7 उमेदवारांची यादी समोर आली आहे. 

    दुसऱ्या यादीत कुणाची नावं?

     

    1. सुनिल टिंगरेंना - वडगाव शेरी
    2. सना मलिक - अणुशक्तीनगर
    3. संजयकाका पाटील - तासगाव कवठे महांकाळ
    4. निशिकांत पाटील - इस्लामपूर
    5. ज्ञानेश्वर कटके - शिरूर
    6. झिशान सिद्दीकी - वांद्रे पूर्व 
    7. प्रताप चिखलीकर - लोहा कंधार

     

  • 09:45 AM • 25 Oct 2024
    Maharashtra Election 2024 : ‘हसन मुश्रीफ 25 वर्षात शरद पवारांनी तुम्हाला काहीच दिलं नाही का?’ रोहित पवारांचा थेट सवाल

    “आपल्याला गद्दारी गाडायची आहे. निष्ठेला विजयी करायचं आहे. ही लढाई व्यक्ती-व्यक्ती मधील नाही, तर विचार-विचारांमधील आहे. या राज्य सरकारने महाराष्ट्रापेक्षा गुजरातचा विचार जास्त केला. मला हसन मुश्रीफ यांना विचारायचं आहे, 25 वर्षात शरद पवारांनी तुम्हाला काहीच दिलं नाही का?. तुम्हाला दिलेल्या ताकदीचा वापर, तुम्ही सर्वसामान्यांसाठी कराल असं पवार साहेबांना वाटलं होतं. ईडीच्या कारवाईला घाबरून हसन मुश्रीफ पळून गेले” अशी टीका रोहित पवार यांनी केली.

     

follow whatsapp