Maharashtra Assembly Election 2024 LIVE : "शिंदे सरकारकडून महाराष्ट्राची लूट" रमेश चेन्नीथला स्पष्टच बोलले!

मुंबई तक

30 Oct 2024 (अपडेटेड: 30 Oct 2024, 12:11 PM)

Maharashtra Election Live Updates : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

Mumbaitak
follow google news

Maharashtra Assembly Election 2024 LIVE News and Updates in Marathi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. कालपर्यंत सगळ्या उमेदवारांचे अर्ज भरून झाले आहेत. आज या अर्जांची छाननी केली जाणार आहे. आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे. राजकीय नेत्यांच्या रॅली आणि सभा होत आहेत. 

शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापल्यानंतर 36 तासांपासून अज्ञातवासात गेले होते. आता वनगांचा कुटुंबीयाशी संपर्क झाला . मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास घरी येऊन वनगा पुन्हा नातेवाईकांकडे गेले, अशी माहिती पत्नी सुमन वनगा यांनी दिली आहे. तिकीट नाकारल्यामुळे डिप्रेशनमध्ये ते घर सोडून गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे. 

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर... 

  • 04:14 PM • 30 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 : भाजप नेत्यांना सोडणार नाही- सुधाकर शृंगारे

    भाजपाचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत ऐन निवडणुकीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या मंचावरून बोलताना त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे आमदार आणि स्थानिक नेते मला कोणत्याही तालुक्यात स्वतंत्ररित्या फिरू देत नव्हते. माझावर बंधने होती.  माझा पराभव भाजपच्याच स्थानिक नेत्यांनी केला. आता एकालाही सोडणार नाही असं शृंगारे म्हंटले आहे.

  • 04:13 PM • 30 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 : महाविकास आघाडीच्या उमेदवारावर आरोप

    चिंचवड विधानसचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केलाय. हा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जावेद रशीद शेख यांनी केला आहे, यासंबंधी काळेवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय.

     

  • 04:12 PM • 30 Oct 2024
    मविआत मतभेद नाहीत, सर्व 288 जागांवर उमेदवार उभे केले – काँग्रेस

    महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले, “सर्व 288 जागांवर महाविकास आघाडी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. जेव्हा तुम्ही मविआची महायुतीशी तुलना करता तेव्हा आमच्या गटात कोणतेही मतभेद नाहीत. महायुतीमध्ये लढत सुरू आहे. आम्ही मविआमध्ये सर्व पक्षांना समान वागणूक दिली आहे. महाआघाडीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना-शिंद्यांच्या सर्व जागा चोरल्या आहेत. भाजपला आपल्या मित्रपक्षांना संपवायचे आहे, हा स्पष्ट संदेश आहे. महाविकास आघाडी, आम्ही सर्व एकत्र आहोत.

     

  • 12:07 PM • 30 Oct 2024
    "शिंदे सरकारकडून महाराष्ट्राची लूट" रमेश चेन्नीथला स्पष्टच बोलले!

    “शिंदे सरकारकडून महाराष्ट्राची लूट केली जातेय. महाविकास आघाडीत कोणतेच मतभेद नाहीत, आम्ही एकत्र आहोत. लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीसाठी आणली”, असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

     

  • 11:10 AM • 30 Oct 2024
    Manoj Jarange विधानसभा निवडणुकीसाठी नवीन रणनिती आखणार? बैठक का केली रद्द?

    मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समाजातील उमेदवारांना निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठी सांगितलं होतं. सर्वाधिक मराठवाड्यात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. कोणाला पाठिंबा द्यायचा की निवडणूक लढवायची याबाबत निर्णय मनोज जरांगे जाहीर करणार आहेत. पण जरांगेंच्या या निर्णयाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेलं असताना जरांगेंनी मात्र निर्णय़ घेण्यापूर्वी बैठक रद्द केली. तसंच एक बैठक जरांगे घेणार आहेत पण त्या बैठकीत जरांगे नवीन रणनिती आखणार असल्याचं बोललं जातंय. 
     

  • 10:35 AM • 30 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 : कुणी बंडखोरी करुन अर्ज भरला असेल तर आम्ही समजूत काढू – संजय राऊत

    कुणी बंडखोरी करुन अर्ज भरला असेल तर आम्ही समजूत काढू. 90 टक्के जागांवर आम्ही कार्यकर्त्यांची समजूत काढली… कोकणात शिनसेना जास्त जागा लढतंय… सांगलीचा पॅटर्न आता लोकांनी विसरायला हवा… जिथे पक्ष जिंकू शकतो तिथे जास्त जागा… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

     

  • 10:34 AM • 30 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये 361 उमेदवारांनी केला अर्ज

    नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघात 361 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 506 लोकांनी उमेदवारी अर्ज नेला होता.  4 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ आहे. बंडखोरांना शांत करण्याचा सर्व पक्षातील नेत्यांसमोर आव्हान आहे. जिल्ह्यातील पाच ते सहा मतदारसंघात प्रमुख पक्षातील नेत्यांनी बंडखोरी केली आहे. बंडखोरांची समजूत काढण्यात पक्ष नेतृत्वाला यश येतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

     

     

  • 10:31 AM • 30 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 : हा कसला ‘मावळ पॅटर्न’, हा तर…! सुनील शेळकेंचा भाजपाला इशारा

    अजित पवार गटाने मावळ विधानसभेसाठी मैत्रीपूर्ण लढतीचा ठेवलेला प्रस्ताव स्थानिक भाजपने फेटाळून लावला. पक्षाने एबी फॉर्म दिला असताना ही स्थानिक भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, असा गौप्यस्फोट करत सुनील शेळकेंनी अखेर मावळ पॅटर्न बाबतचं मौन सोडलेलं आहे. अजित पवार गटातील बंडखोर बापू भेगडेंना भाजप, शरद पवार गटासह सर्व पक्षीयांनी पाठिंबा दहशत मावळ पॅटर्न राबवलाय. पण हा कसला मावळ पॅटर्न, हा तर फक्त चार कुटुंबाच्या हिताकरिता राबविण्यात आलेला पॅटर्न आहे. हा चुकीचा पायंडा तुम्ही पाडत असाल तर भाजपला याचे परिणाम राज्यभर भोगावे लागतील, असा इशारा ही शेळकेंनी दिला.

     

follow whatsapp