Maharashtra breaking news in marathi : नौदल दिनानिमित्त राजकोट येथे अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा काल मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कोसळला. या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत.
नांदेडचे काँग्रेस पक्षाचे खासदार वसंतराव चव्हाण (वय ७०) यांचे काल पहाटे चार वाजून पाच मिनिटांनी निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावार नायगाव येथे सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राज्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
- 08:24 PM • 27 Aug 2024Jay Shah : जय शाहा ICC चे सर्वात तरुण अध्यक्ष
जय शाहा यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड. वयाच्या ३५ व्या वर्षी अध्यक्षपदाचा मान मिळवणारे जय शाहा आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष
- 02:17 PM • 27 Aug 2024Dahi Handi 2024 : 'गो, गो गोविंदा...' दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये रंगली चुरस!
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. तर त्यांना फोडण्यासाठी दहीहंडी पथकांमध्ये चुरस रंगताना दिसत आहे.
- 02:12 PM • 27 Aug 2024Maharashtra News: दहीहंडी उत्सवात आत्तापर्यंत 15 गोविंदा जखमी
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. दहीहंडी उत्सवात आत्तापर्यंत 15 गोविंदा जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सेंट जॉर्ज हॉस्पिटलध्ये 1, पोद्दारमध्ये 4, केईममध्ये 1, नायरमध्ये 2, सायन रुग्णालयात 2, राजावाडीमध्ये 1 , एमटी अगरवाल रुग्णालयात 1 आणि कुर्ला भाभा रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
- 10:00 AM • 27 Aug 2024Thane News: टेंभीनाक्यावरच्या दहीहंडीत उत्साहाचं वातावरण
ठाणेची ओळख असलेल्या टेंभीनाक्यावरच्या ‘दिघे साहेबांची दहीहंडी’ काहीच वेळास सुरु होणार आहे. दिघे साहेबांची दहीहंडीची जय्यत तयारी सुरू आहे. मोठमोठ्या कटआउट्स पाहायला मिळत आहेत. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असणारे बॅनर्स पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचही बॅनर आहे. आज दिवसभर ठाणे ,मुंबई आणि मुंबई उपनगरात दही हांडीची धूम पाहायला मिळणार आहे.
- 09:00 AM • 27 Aug 2024Maharashtra News: सरकारला काय त्रास होतो त्याच्याशी देणं घेणं नाही, आम्हाला...- मनोज जरांगे
सरकारला काय त्रास होतो त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, शेतकऱ्यांना किती वेदना आहेत ते आमच्यासाठी महत्त्वाच असल्याचं मनोज जरांगे म्हणालेत. शेतकऱ्यांनी जर मनावर घेतलं तर 2024 मधील निवडणूक कर्ज मुक्तीचे मोठं आंदोलन होतं असं म्हणत मताच्या रुपात आंदोलन करायचं असं जरांगे म्हणालेत. शेतकरी, गोर गरीबांनी मत द्यायचं आणि सरकारचा कार्यक्रम लावा असं जरांगे यांनी म्हटलय. तुम्ही फक्त मत द्या, परिवर्तन अटळ आहे असं सांगत सरकारने 30 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज मुक्ती नाही केली, तर 2024 च्या विधानसभा निवडणुकीला आंदोलन समजा आणि मत देऊन यांचं वाजवून टाका असा इशारा जरांगे यांनी दिलाय.
- 08:34 AM • 27 Aug 2024Maharashtra News: आराध्य दैवत असलेल्या महाराजांचा पुतळा लवकरच उभारू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्या देवत आहेत. झालेली घटना दुर्दैवी आहे. हा पुतळा नेवी ने उभारलेला. ४५ किलोमीटर प्रतितासीवारा होता त्यात हे नुकसान झाले. उद्या त्या ठिकाणी नेवी अधिकारी येणार आहे. आराध्य दैवत असलेल्या महाराजांचा पुतळा लवकरच उभारू, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
- 08:34 AM • 27 Aug 2024Maharashtra News: मुंबईत काळबादेवी परिसरात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू तर एक जखमी
मुंबईत काळबादेवी परिसरात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झालाय. फणसवाडीतील इमारतीची ३० फूट लांब भिंत कोसळली आहे. शेजारील इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असताना ड्रिल मशीनच्या वायब्रेशनुळे दुर्घटना घडल्याचा दावा केला जातोय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT