Maharashtra breaking news in marathi : ऐतिहासिक गैबी चौकात आज सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा मेळावा होत आहे. यावेळी पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असून, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यावेळी समरजितसिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यकर्त्यांसह प्रवेश होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
भाजप आमदार पंकजा मुंडे आजपासून 4 दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. 6 विधानसभा मतदारसंघाचा त्या आढावा घेणार आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघांचा त्या आढावा घेतील.
तसेच येत्या 48 तासांत मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 12:39 PM • 03 Sep 2024Maharashtra News : गिरीश महाजन यांना इंगाच दाखवतो- मनोज जरांगे
जामनेरमध्ये 1 लाख 20 हजार मराठा आहेत. बघतोच गिरीश महाजनकडे. इंगाच दाखवतो, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
- 12:38 PM • 03 Sep 2024Maharashtra News : जयदीप आपटेला लूक आऊट नोटीस जारी
मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याला लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. पुतळा पडल्याच्या दिवसापासून आपटे हा फरार आहेत. पोलीस त्याचा शोध घेत असून तो अजूनही सापडलेला नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलिसांनी त्याला लूक आऊट नोटीस बजावली आहे.
- 12:27 PM • 03 Sep 2024एसटी कर्मचाऱ्यांनी उपसलं बेमुदत संपाचं हत्यार! यामागचं नेमकं कारण काय?
ST Bus Employee Strike : विदर्भातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पोळा सणाच्या निमित्ताने व्यापारपेठ गजबजली असताना आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. राज्यातील लालपरीची चाके ठप्प होण्याची चिन्हे आहेत. सणानिमित्त चंद्रपूरच्या मुख्य बसस्थानकावर हजारो प्रवाशांची गर्दी आहे. मागील थकीत वेतन आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची भूमिका घेतली आहे. गणेशोत्सव सुरु होणार असल्याने राज्यभर प्रवाशांची मोठी गर्दी राहणार आहे. अशातच आचारसंहितेच्या आधी एसटीचे खाजगीकरण व अन्य प्रलंबित मुद्द्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी माहिती एसटी कामगार संघटना विभागीय अध्यक्ष दत्ता बावणे यांनी दिलीय.
- 12:07 PM • 03 Sep 2024Maharashtra News : विजय वडेट्टीवारांच्या विरोधात बंजारा समाज आक्रमक
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज संभाजीनगर येथे बंजारा समाज चांगलाच आक्रमक झालाय. शहरातील सिडको चौकात बंजारा समाजाच्या वतीने वडेट्टीवारांच्या फोटोला जोडे मारत बंजारा समाज बांधवांनी आपला निषेध व्यक्त केलाय.
- 10:52 AM • 03 Sep 2024Maharashtra News : 'शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस भाजपचाच'- संजय राऊत
'शिवरायांनी सुरत लूट केलीच नाही, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यानंतर यावर संतप्त प्रतिक्रिया देत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस भाजपचाच आहे', असं ते म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT