Maharashtra Breaking News : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मुंबई तक

03 Oct 2024 (अपडेटेड: 03 Oct 2024, 08:48 PM)

Maharashtra Live News : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स तसंच हवामानाचा अंदाज 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या सर्व फक्त एका क्लिकवर...

marathi bhasha, central government

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

follow google news

Maharashtra breaking news in marathi : शारदीय नवरात्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्त महाराष्ट्रातील सर्व देवींच्या मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. आज घटस्थापनेचा मुहुर्त साधत अनेक राजकीय मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यातील गुडलक चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉमन मॅन म्हणून बॅनर लागला आहे. दिवस रात्र काम करणारा मुख्यमंत्री असा आशय बॅनरवर लागला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून प्रचाराची सुरुवात केली गेली आहे. मुख्यमंत्र्यांचा मोठा बॅनर झळकला आहे.

आम्ही आकड्यांवर लढ नाही तर महाविका आघाडी म्हणून एकत्र लढत आहोत. जो जिंकेल त्याला जागा दिली जाईल. आम्हाला गद्दार गटाचा पराभव करायचा आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

लाइव्हब्लॉग बंद

  • 08:47 PM • 03 Oct 2024
    मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

    विधानसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

  • 04:04 PM • 03 Oct 2024
    Maharashtra News : तुम्ही कितीही वर्ग तयार करा, पण विधानसभेत हेडमास्तर मराठा समाज- जरांगे पाटील

    मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आचारसंहिता लावू नये. लोकसभेवेळेस सांगितले होते आणि आताही सांगतोय, मराठ्याच्या मागण्या पूर्ण करा, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तुम्ही कितीही वर्ग तयार करा, पण विधानसभेत हेडमास्तर मराठा समाज असेल असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय. ते अंतरवली सराटीत बोलत होते.

  • 01:11 PM • 03 Oct 2024
    Maharashtra News : पुणे स्कूल बस अत्याचार प्रकरण

    पुण्यात स्कूल बसमध्ये ड्रायव्हरकडून दोन चिमुकलींवर अत्याचार करण्यात आला आहे. “दोन अल्पवयीन मुलींच्या आईंची तक्रार आहे. आरोपीला अटक केली आहे. स्कूल बसमध्ये महिला मदतनीस होती का? याचा तपास करत आहोत. स्कूल बस शाळेची होती की भाडेतत्त्वावर घेतलेली? याबाबत माहिती घेत आहोत” आर राजा यांनी ही माहिती दिली. अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पाटील आणि पोलीस उपायुक्त आर राजा यांच्यात बैठक

     

  • 11:58 AM • 03 Oct 2024
    Maharashtra News : 'देवेंद्र यांचं वक्तव्य चुकीचं...', उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टच बोलले!

    ‘मुलगी जर दिसायला चांगली असेल तर ती तुमच्या माझ्या सारख्यांना भेटत नाही, तर ती नोकरीवाल्या मुलाला भेटते. दोन नंबरची मुलगी कोणाला भेटते, पान टपरीवाल्याला, किराणा दुकानदाराला तर, तीन नंबरचा गाळ हेबडली हाबडली पोरगी शेतकऱ्याच्या पोराला मिळते.’ असे वक्तव्य अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले होते. महिलांच्या दिसण्यावरून वादग्रस्त वक्तव्य केल्याने आता राजकारणातून तसेच बाहेर संताप व्यक्त होत आहे. यावर अजित पवारही बोलले आहेत. ते म्हणाले की, 'देवेंद्र भुयार यांचं वक्तव्य चुकीचं आहे. त्याचं वक्तव्य मुलींना वेदना देणारं आहे. त्यांना समज दिली आहे,' असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

  • 11:48 AM • 03 Oct 2024
    Maharashtra News : महायतीत राष्ट्रवादीमध्ये अल्पसंख्यांक समाजाला दहा टक्के जागा - उपमुख्यमंत्री अजित पवार

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा बीडच्या माजलगाव इथे दाखल झाली होती. याच माजलगाव विधानसभा मतदार क्षेत्रातून अजित पवारांनी अल्पसंख्यांक समाजातील राजकीय नेत्यांकरिता महत्त्वाची घोषणा केलीय. राज्यात महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जेवढ्या जागा येतील त्यापैकी दहा टक्के जागा अल्पसंख्यांक समाजाला देण्याचं ठरवलं असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केले आहे.

    राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. अशातच महायुती, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकीय घोषणा केल्या जात आहेत. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रे दरम्यान अल्पसंख्यांक समाजाच्या राजकीय नेत्यांकरिता महत्त्वाची घोषणा करत दहा टक्के जागा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतील असं जाहीर केल आहे.
     

  • 11:46 AM • 03 Oct 2024
    Maharashtra News : कणकवली शहरातील बॅनर नेमका कोणाला उद्देशून?

    कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून काही नावे इच्छुकांच्या यादीत असताना आता या जागेसाठी हळूहळू रस्सीखेच होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपाकडून नितेश राणे हे उमेदवार निश्चित असताना मात्र ठाकरे गटाचे उमेदवार कोण हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यातच सर्वांकडूनच उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी केली जात असताना काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक देखील झाली. या बैठकीत अंतिम निर्णय झाला नसला तरी काही कडून लॉबिंग केलं गेल्याची ही चर्चा सुरू होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल "तो येतोय” सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी" कणकवली विधानसभा व त्याखाली मशाल चिन्ह अशा आशयाचा बॅनर लावला गेला आहे. हा बॅनर ठाकरे गटाकडून लावला गेला असल्याचे प्रथमदर्शनी जरी दिसत असले तरी त्याची अधिकृत जबाबदारी अद्याप कुणीही घेतलेली नाही. हा कोणाला इशारा देणारा बॅनर आहे? तरी घराणे शाही चा आरोप हा ठाकरे गटातील इच्छुकांवरही येऊ शकतो. अशी देखील चर्चा दबक्या आवाजात केली जात आहे. पक्षांतर्गत कुरबुरी तुन याचा रोख युवा सेना जिल्हाप्रमुख इच्छुक उमेदवार सुशांत नाईक यांच्यावर देखील असू शकतो. अशी चर्चा आहे. मात्र तो तसा आहे का? हे अद्याप तरी कोणी स्पष्ट केले नाही. त्यामुळे या उलट सुलट चर्चामुळे हा बॅनर सध्या कणकवली सह जिल्ह्यात उलट सुलट चर्चामुळे हा बॅनर सध्या कणकवली सह जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे अशा बॅनर च्या माध्यमातून "तो येतोय" तो येणारा कोण? असणार ते लवकरच स्पष्ट होणार आहे.
     

  • 11:23 AM • 03 Oct 2024
    Maharashtra News : माजी आमदार, शिवसैनिक ज्ञानेश्वर पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

    भूम परांडा वाशी मतदारसंघाचे माजी आमदार, शिवसैनिक ज्ञानेश्वर पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. लंग्ज इन्फेक्शन झाल्यामुळे माजी आमदार पाटील यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल केले होते. पण काल रात्री साडेदहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज (गुरुवार) सकाळी 11 वाजता परंडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

    सामान्य शिवसैनिक ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. सुरुवातीच्या काळात ड्रायव्हर म्हणून काम करणारे पाटील पुढे शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात उतरले आणि 1995 आणि 1999 अशा दोन वेळेस ते भूम परंडा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले होते.

    एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखले जायचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता.
     

follow whatsapp