Maharashtra breaking news in marathi : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अखेर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागतील. मतदानाच्या तिसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांचा निकाल लागणार आहे.
सध्या निवडणुकांची घोषणा होताच सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. लवकरच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे.
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 04:53 PM • 16 Oct 2024Maharashtra Assembly Election 2024 Live : महायुतीला मोठा झटका! महादेव जानकर महायुतीमधून बाहेर
जागावाटपात विचारात न घेतल्याने निर्णय. २८८ जागा राज्यात लढवणार. दोन दिवसात पहिली यादी जाहीर करणार. महादेव जानकर यांच्या पक्षाला जागा वाटपात विचारात घेतलं नाही म्हणून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहेे.
- 12:38 PM • 16 Oct 2024Maharashtra Assembly Election 2024 Live : लाडकी बहीण योजनेला कोणी टच केलं तर करेक्ट कार्यक्रम होणार- मुख्यमंत्री शिंदे
'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला कोणी टच केलं तर करेक्ट कार्यक्रम होणार',असा इशार एकनाथ शिंदे यांनी दिला.
- 12:13 PM • 16 Oct 2024Maharashtra Assembly Election 2024 : पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र नंबर 1 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Maharashtra News : पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. आम्ही एवढी कामं केली की ती रिपोर्ट कार्डमध्येही मावत नाहीत. अटल सेतून, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोडचं काम सरकारने केलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
- 12:11 PM • 16 Oct 2024Maharashtra Assembly Election 2024 : आता साडे आठ रुपयाची वीज ३ रुपयाला पडणार – देवेंद्र फडणवीस
आता साडे आठ रुपयाची वीज ३ रुपयाला पडणार आहे. १० हजार कोटी बजेट आणि पाच हजार कोटी क्रॉस सबसिडीचे आम्ही वाचवणार आहोत… प्रिंटिंग मिस्टेक घोषणा नाही. हा वेल थॉट म्हणजे विचारपूर्वक निर्णय घेतलाय. अनेक वर्ष तो चालणार आहे – देवेंद्र फडणवीस
- 12:02 PM • 16 Oct 2024Maharashtra Breaking News : आरोप करताना तारतम्य बाळगलं पाहिजे – अजित पवार
आरोप करताना तारतम्य बाळगलं पाहिजे. विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणीच्या यशामुळे विरेधक गडबडले असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
- 11:57 AM • 16 Oct 2024Maharashtra Breaking News : लाडकी बहीण योजनेमुळे राज्य कंगाल होईल- राज ठाकरे
लाडकी बहीण योजनेमुळे राज्य कंगाल होईल… पैसे फुकट वाटून काही होणार नाही… पैसे तुमच्या घरचे नाहीत… सरकारचे आहेत… असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.
- 11:08 AM • 16 Oct 2024Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकांचे असं असेल संपूर्ण वेळापत्रक
22 ऑक्टोबरला अधिसूचना निघेल 23 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरता येईल 29 ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे 30 ऑक्टोबरला अर्जाची छाननी होईल 4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल
- 11:00 AM • 16 Oct 2024Maharashtra Breaking News : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ!
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या सुरक्षेसाठी जवळपास 100 मुंबई पोलिसचे जवान तैनात आहेत. ज्यामध्ये काही पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये आहेत. सलमान खानच्या गॅलेक्सी घराबाहेर असलेली ही कार त्याच्या स्कॉटची आहे. याशिवाय त्याच्या घराबाहेर २४ तास पोलिस तैनात असतो. सीसीटीव्हीच्या मदतीनेही सुरक्षेवर लक्ष ठेवले जाते. सध्या सलमान खानच्या घराबाहेर सर्वत्र ठिकाणी पोलीस तैनात आहेत. त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा छावणी स्वरूप झाले आहेत.
- 10:56 AM • 16 Oct 2024Maharashtra Breaking News : अंधेरीत रिया पॅलेसमध्ये आग, 3 जणांचा होरपळून मृत्यू!
मुंबईतील अंधेरी पश्चिममध्ये असणाऱ्या रिया पॅलेसमध्ये आग लागली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.सकाळी आठच्या सुमारास ही आग लागली, ही आग लेव्हल 1 ची होती.सध्या आग विझवण्यात आली आहे.अंधेरी पश्चिम लोखंडवाला येथील रिया पॅलेस इमारतीला आग लागली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT