Maharashtra Assembly Election 2024 LIVE : वरुण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, अनिल परबांचे मोठे विधान

मुंबई तक

17 Oct 2024 (अपडेटेड: 17 Oct 2024, 12:05 PM)

Maharashtra Live Updates : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स तसंच हवामानाचा अंदाज 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या सर्व फक्त एका क्लिकवर...

Mumbaitak
follow google news

Maharashtra Assembly Election 2024 LIVE : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा मुख्य सामना आहे. कुठल्या पक्षाच्या वाट्याला किती जागा मिळणार? याची उत्सुक्ता आहे. लवकरच जागावाटप जाहीर होईल, असं काल महायुती आणि महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर मोठ्या प्रमाणात सुरु आहेत.

परिवर्तन महाशक्तीची आज पुण्यात बैठक होणार आहे. यात जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. परिवर्तन महाशक्तीची आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन बैठक आहे. 

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर... 

लाइव्हब्लॉग बंद

  • 12:06 PM • 17 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 : 20 तारखेला काँग्रेसची पहिली यादी अपेक्षित- विजय वडेट्टीवार

    आज किंवा उद्या मविआची संयुक्त पत्रकार परिषद घेऊ. जागावाटपावर यआज तोडगा निघाल्यास 20 तारखेला काँग्रेसची पहिली यादी जाहीर होईल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

     

  • 12:05 PM • 17 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 : महाविकास आघाडीची बीकेसी मधील सोफिटेल हॉटेलमध्ये बैठक

    महाविकास आघाडीची बीकेसी मधील सोफिटेल हॉटेलमध्ये बैठक होत आहे.  नाना पटोले , जितेंद्र आव्हाड, संजय राऊत बैठकीसाठी पोहोचले.

     

  • 12:02 PM • 17 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 : वरुण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, अनिल परबांचे मोठे विधान

    अनिल परब यांनी गट प्रमुख मेळाव्यातून मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. तर वरूण सरदेसाई हे बांद्रा विधानसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार असाही विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

     

  • 12:00 PM • 17 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 : सुजय विखे पाटील निवडणूक लढवणार नाहीत

    अहमदनगरच्या संगमनेर विधानसभा मतदार संघातून माजी खासदार सुजय विखे पाटील निवडणूक लढवणार नाहीत. पक्षाकडे सुजय विखे यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारी दाखवली होती. पण पक्षाकडून सुजय यांच्या नावाचा उमेदवारीसाठी विचार नाही. ती जागा महायुतीत शिवसेनेकडे असल्याने उमेदवार कोण याची चर्चा होत आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात सुजय विखे यांनी तयारी केली होती.  एकाच घरात 2 तिकीट नको म्हणून पक्षाने निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

     

  • 11:53 AM • 17 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 : 'जागांचा निर्णय जयंत पाटील घेतील', शरद पवार यांचं मोठं विधान

    “जागांचा निर्णय जयंत पाटील घेतील. जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदाबाबत बोलण योग्य” असं शरद पवार म्हणाले.
     

follow whatsapp