Maharashtra Assembly Election 2024 News LIVE : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या. काल संध्याकाळी सहा वाजेपासून प्रचार बंद करण्यात आला. तर उद्या मतदान पार पडणार आहे. त्यासाठी राज्यभरा निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे राज्यभरातील काही घटनांमुळे वातावरण ढवळून निघालं आहे. काही ठिकाणी उमेदवारांवर हल्ले झाले, तर काही ठिकाणी रोख रक्कम जप्त करण्यात आली, तर काही ठिकाणी अन्य प्रकार घडले. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. यामध्ये मतदारांना पैसे वाटून बोटाला शाई लावल्याचं समोर आलंय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी यावरुन आरोप करत संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप करण्यात केले आहेत.
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
- 03:35 PM • 19 Nov 2024विनोद तावडे, राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल!
भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरही आचार संहिताभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचं समोर आलं. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी या मतदारसंघात आले होते, असा आरोप बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी केला. ही धक्कादायक घटना विवांता हॉटेलमध्ये घडली. त्या ठिकाणी बविआचे उमेदवार क्षितीज ठाकूर कार्यकर्त्यांसह पोहोचले आणि तावडेंना घेरलं.
- 01:16 PM • 19 Nov 2024विनोद तावडे यांना घेरलं, पैसे वाटताना पकडल्याचा हितेंद्र ठाकूर यांना आरोप
उद्या राज्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे, मात्र यापूर्वीच राज्यात अनेक ठिकाणी मोठा राडा होताना दिसतोय. पालघरमध्ये तर भाजप नेते विनोद तावडे यांनाच बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना घेरून घेतल्याचं समोर आलं आहे. विनोद तावडे यांना पैसे वाटताना पडकलं असून, त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर त्यांना उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत इथेच डांबून ठेवू असं हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत.
- 09:22 AM • 19 Nov 2024बोटाला पैसे लावून शाई वाटल्याचा प्रकार, संभाजीनगरमध्ये काय घडलं?
राज्यात उद्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान आहे. मात्र आता ऐन निवडणुकीच्या एक दिवस आधी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोटाला शाई लावून, मतदान कार्ड जमा करुन पैसे वाटप होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरुन छत्रपती संभाजीनगरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काहीवेळ चांगलाच गोंधळ झाल्याचं समजतंय. तसंच पोलिसांनी 18 लाखांची रक्कम जमा करुन 2 कोटी सोडून दिलेत असं म्हणत संजय शिरसाट यांनी फोन केल्याचा आरोप केला आहे.
ADVERTISEMENT